बहुजननामा ऑनलाईन टीम – मुंबईतील वरळी भागात इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पूनम चेंबरजवळ स्टर्लिंग सीफॅस इमारतीला ही आग लागली होती. रात्रीच्या सुमारास इमारतीच्या 10व्या मजल्यावर ही आग लागली होती. मात्र, अग्निशमक दलाने वेळीच धाव घेतल्याने 11 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
आगीची माहिती मिळताच पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. यावेळी तातडीने 11 व्या मजल्यावर अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली. आगीत कोणीही जखमी झाले नसून अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली गेली आहे. भीती शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत मुंबईत इमारतींना आग लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षिततेला पृाधान्य दिले पाहिजे असे अग्निशमक दलाने सांगितले आहे.