ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – व्हाटसअॅपवर तिहेरी तलाक दाऱ्या पतीविरोधात गुरुवारी रात्री मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिहेरी तलाकविरोधी कायदा मंजूर झाल्याने आता तीन तलाक म्हणत तलाक देणे मुस्लीम तरुणांसाठी दु:स्वप्न ठरले आहे.
तक्रारदार महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलसांनी तिच्या सासू, सासरा आणि पतीविरूध्द तिहेरी तलाक प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला ही 7 महिन्याची गरोदर असून तिला तिच्या पतीने व्हॉट्स अॅपवरून तलाक…तलाक…तलाक असा मेसेज पाठवला होता. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली आणि त्यानुसार गुन्हा दाखल झाल्याची माहिती मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.
लोकसभा आणि राज्यसभेत तिहेरी तलाकचं विधेयक मंजूर झाल्यानंतर बहुतांश महिलांनी अखेर न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
तक्रारदार महिलेचं शिक्षण हे एमबीएपर्यंत झालेलं आहे. तिचे लग्न मुंब्रा येथील अमृतनगरमधील यशोदीप इमारतीत राहणाऱ्या इम्तियाज गुलाम हुसेन पटेल याच्याशी झाले होते. लग्नानंतर काही दिवसांतच पती आणि सासरच्या मंडळीने तिच्याकडे पैशांची मागणी केली. पिडीतेचे आई वडिल गरीब आहेत. त्यामुळे तिने पती आणि सासरच्या मंडळींना मैत्रिणीकडून उसने पैसे घेऊन गाडी घेऊन दिली. तरीही पती इम्तियाज पटेल, सासू रिहाना पटेल, नणंद सुलताना गुलाम हुसेन पटेल आदींनी दागिने आणि पैशांची मागणी केली. मध्यंतरी इम्तियाज हा अबुधाबी येथे कामासाठी जात होता. परंतु तो हुंड्याची मागणी करत होता. सप्टेंबर २०१७ मध्ये त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे समजले. तिने त्याचा जाब विचारला तेव्हा तिला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच त्याने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी ३० नोव्हेंबर २०१८ रोजी इम्तियाज याने मोबाईलवरून तीनदा तलाक उच्चारून तलाक दिला. तिने याचा स्क्रीनशॉट काढून आईला पाठवला. त्यावेळी ती सात महिन्यांची गर्भवती होती.