नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून राष्ट्र्वादीतले नेते हे पक्षांतराचा मार्ग निवडताना दिसत आहेत. यामुळे राष्ट्रवादीला धक्क्यांवर धक्के बसत असतानाच आता शुक्रवारी पुन्हा एक मोठा धक्का राष्ट्रवादीला बसला आहे. मालेगावचे माजी आमदार मुफ्ती इस्माईल यांच्यासह महानगरपालिकेतील २० नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पत्रकार परिषदेत या सगळ्यांनी या मागचे कारणही स्पष्ट केले.
तिहेरी तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. मात्र या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अनुपस्थित होते. त्यांनी चर्चेला हजर राहून विधेयकाला विरोध न केल्यामुळे आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे या नगरसेवकांनी सांगितले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.
दरम्यान, कोणत्या पक्षात या नगरसेवकांचा प्रवेश असेल हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. या नगरसेवकांचे नेतृत्त्व आमदार मुफ्ती इस्माईल करत असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०१७ मध्ये मालेगाव महानगरपालिकेत झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला २० जागांवर विजय मिळाला होता. तर काँग्रेसला २८, शिवसेना १३, भाजप ९, एमआयएम ७, जनता दल ६ आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता.
- पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे
- घरातील सर्व प्रकारच्या स्वच्छेतेसाठी बनवा नैसर्गिक पद्धतीने घरगुती ‘क्लिनर’
- चेहऱ्यांची ‘सुंदर’ता आणि ‘चमक’ वाढविण्यासाठी हळदीचे पाणी उपयुक्त, जाणून घ्या याचा वापर
- केसातील ‘कोंड्या’पासून मुक्तीसाठी करा ‘हे’ १० घरगुती आयुर्वेदिक उपाय
- ‘अॅल्युमिनियम फॉईल’मध्ये जेवण पॅक करता, तर होऊ शकतात ‘हे’ आजार
- सावधान ! पुण्यात मुलांमध्ये विषाणूजन्य ताप, अतिसार, डेंग्यू आणि हँड-फूट-माऊथ आजाराची ‘साथ’
- त्वचेचा कर्करोग टाळण्यासाठी करा ‘हे’ 4 घरगुती उपाय, जाणून घ्या