बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार स्वरा भास्कर (Swara Bhaskar) नेहमीच इंडस्ट्रीशी संबंधित किंवा समाजातीलही काही मुद्द्यांवर भाष्य करताना दिसत असते. यामुळं अनेकदा ती वादातही सापडत असते(Farmers Protest) आणि ट्रोल देखील होत असते. स्वरा भास्कर शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना दिसून आली होती. आता मात्र ती आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसली. या आंदोलनात सहभागी झाल्याचे काही फोटोही तिनं सोशलवरून शेअर केले आहेत. अशात यासाठी काहींनी तिला ट्रोलही केलं आहे.
स्वरानं तिच्या ट्विटरवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यात स्वरा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत बसलेली दिसत आहे. यावेळी तिनं सोशल डिस्टेंसिंगचं पालनही केलं आहे.
A humbling day, to see the grit, resolve and determination of protesting farmers and the elderly at #SinghuBorder #FarmersProtests pic.twitter.com/WIGg6bdqkF
— Swara Bhasker (@ReallySwara) December 17, 2020
स्वरानं एकूण 3 फोटो शेअर केले आहेत.या सोबत तिनं लिहिलं की, एक विनम्रता देणारा दिवस. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं आणि वृद्धांचं धैर्य, संकल्प आणि चिकाटी पाहण्यासाठी.
https://twitter.com/prakash59625587/status/1339593596513656833?s=20
स्वराचं हे ट्विट सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. यासाठी काहींनी तिचं कौतुक केलं आहे. तर काहींनी मात्र तिला ट्रोलही केलं आहे.
Aaja tu bhi …tri family ko b sth le aa..koi paise nhi lgte wha p
— devender746 (@devender7461) December 17, 2020
स्वराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती भाग बीनी भाग सिनेमात झळकली आहे. हा सिनेमा 4 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईमवर रसभरी ही तिची वेब सीरिजदेखील काही दिवसांपूर्वीच रिलीज झाली आहे. यातील काही सीनवरून वादही झाला. सीरिजमध्ये अनेक बोल्ड सीन्स आहेत. काहींना तर ही सीरिज अजिबात आवडली नाही. तिनं रांझना, तनू वेड्स मनू, नीलबट्टे सन्नाटा, वीरे दी वेडिंग अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.
— Champak Dash (@ChampakDash3) December 17, 2020
Hi Swara, I salute you to stand with truth. These days very few people have ability to speak truth. I am feeling like GOI made India like third class country
— Dhillon (@Parwinder4690) December 17, 2020