सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्यावतीने व्यैयक्तीक लाभाच्या योजनेतून मागासवर्गीय शेतकऱ्यांना कडबाकुट्टी मशिन, पाच एचपीचे विद्यूत पंप आणि ठिबक सिंचन या शेतीपयोगी वस्तू सन २०१९-२० या वर्षात पुरविण्यात येणार आहेत, अशी माहिती समाजकल्याण समितीच्या सभापती शिला सचिन शिवशरण यांनी दिली.
समाजकल्याण समितीची मासिक सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती शिला शिवशरण होत्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, सदस्य अंजनादेवी शिवाजी पाटील-चांदजकर, शिवाजी सोनवणे, अतुल खरात, साक्षी महेश सोरटे, आण्णाराव बाराचारे, प्रभावती अमोगसिध्द पाटील, रेखा राजेंद्र गायकवाड, सुनंदा बाळासाहेब फुले, संगिता संगम धांडोरे आदी उपस्थित होते.सन २०१९-२० यावर्षात शिक्षणासाठी शाळेत जाणाऱ्या मुलांना सायकल देण्याची योजना कायम ठेवण्यात आली आहे.
अपंगांसाठी दिली जाणारी झेरॉक्स मशिनची योजना रद्द करुन नव्याने पिठाची गिरणी वाटप योजना सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर १२ वी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी टॅलीचा कोर्स सुरु करण्यात येणार आहे. अपंग व गोरगरीगरीबांसाठी ४ शेळी आणि १ बोकट अशी शेळीगट योजना राबविण्याचा निर्णयही समाजकल्याण समितीने घेतला आहे.
चर्मकार समाजाच्या वतीने दीपमाळा प्रज्ज्वलित
सोलापूर : – श्री सिध्देश्वर यात्रेच्या अनुषंगाने येथील चर्मकार समाजाच्या वतीने खासदार अमर साबळे यांच्या हस्ते, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली दीपमाळा प्रज्ज्वलित करण्यात आले. विठ्ठल व्हनमारे यांनी पाहुण्यांचे स्वागत-सत्कार केले. राजेंद्र काळे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीनिवास धुळगुंडे यांनी आभार मानले.यावेळी श्रीकांत कांबळे, अमोल हेळकर, हरिदास वाघमारे, गणेश बोट्टु, सुनंदा व्हटकर, कल्पना भोसले, प्रभाकर शिंदे, सोपान थोरात, शिवराज तोळणुरे, चंद्रकांत फुलमाळी, त्यागराज व्हनमारे, मल्लिकार्जून दीक्षीत, काशीनाथ चाबुकस्वार, दीपक हरवाळकर, विशाल टोणपे, विशाल कांबळे, चंद्रकांत बिंदगे, शंकर गायकवाड, बाबुशा मोडे, विष्णू कांबळे, अमोल शिंदे, ॲड. मनोज व्हनमारे, सागर व्हटकर, शिवलाल खरटमल, अनिल चव्हाण, सरफराज कांबळे, मल्लिकार्जून मग्रुमखाने, उमेश काळे आदी उपस्थित होते.