पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे सोलापूर रस्त्यावरील प्रसिद्ध हॉटेल कांचनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग आटोक्यात आलेली नसून, पीएमआरडीच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
पुणे सोलापूर महामार्गावर यवत परिसरात शौनक कांचन यांचे हॉटेल कांचन हे आहे. व्हेज हॉटेलम्हणून ते प्रसिद्ध आहे.मोठ्या जागेत असलेले या हॉटेलला आकर्षक असे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्याला प्लाउड, लाकूड आणि फर्निचरने तयार केलेले आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमूळे सध्या हॉटेल तसे बंदच आहे. पण पार्सल सेवा सुरू होती.
दरम्यान, आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हॉटेलला अचानक आग लागली. प्रथम पोलीस व अग्निशमन दलाकडे ही माहिती दिली.यानंतर पोलीस व पीएमआरडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे. पण आग मोठ्या प्रमाणात भडकली आहे. पीएमआरडीला माहिती मिळण्यास उशीर झाला आहे. पावणे चार वाजता कॉल आला. त्यानंतर 14 हजार लिटरचा सर्वात मोठा फायर बंब दाखल केला आहे. आग आटोक्यात आल्यानंतर आग नेमकी का लागली याबाबत माहिती घेतली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभुमीवर आपल्या मुलांना फ्लूची लस देणं कशामुळं महत्वाचं?
रुसून माहेरी गेलेल्या पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने केले असे काही की…
खा. सुप्रिया सुळेंचा थेट सवाल, म्हणाल्या – ‘मुख्यमंत्रिपद मिळावं यात गैर काय?’
भारतीय हवामान खात्याचा सुधारीत अंदाज ! यंदा 101 टक्के पाऊस पडणार, जाणून घ्या कोणत्या भागात किती पाऊस
‘भाजपचं सरकार राज्यात येणार नाही हे पवारांनी फडणवीसांना सांगितलं असेल’