’10 टक्के EWS आरक्षण मोदी सरकारनं दिलं, कर्तव्यशून्य हा आघाडीचा परिचय’

maratha-reservation-10-percent-ews-reservation-given-modi-government-ashish-shelar-slams-mahavikas
June 1, 2021

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा राज्य सरकारने प्रयत्न केला आहे. राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना आता 10 टक्के EWS आरक्षणाचा (EWS reservation) लाभ घेता येणार आहे. यावरुन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडले आहे. मराठा समाजाला EWS आरक्षण (EWS reservation) मिळेल असा निर्णय महाभकास आघाडीने घेतला. ही आघाडी कर्तव्यशून्य आहेच, पण कर्तृत्वशून्य हा त्यांचा परिचय आहे. आता कर्तृत्व परावलंबी आहेत हे सिद्ध झालं. कारण 10 टक्के EWS आरक्षण (EWS reservation) दिलं, त्यात ठाकरे सरकार कर्तृत्वावरही परावलंबी आहे. असे म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

शेलार पुढे म्हणाले, आमची मागणी आहे, गायकवाड कमिशनने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल सिद्ध करुन मराठा आरक्षण मिळालं. मात्र यांनी EWS आरक्षण जाहीर केलं, पण मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा सुरुच राहिल असे शेलार म्हणाले. तसचे EWS मध्ये टाकल्यामुळे मराठा समाज आर्थिक दुर्बल नाही, अशी मांडणी ठाकरे सरकारने करु नये. ओबीसींना मिळणाऱ्या सुविधा मराठा विद्यार्थ्यांना मिळाव्यात यासाठी तीन हजार कोटीचं पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी शेलार यांनी केली.

शिवसेनेने मराठा मोर्चाची खिल्ली उडवली

शिवसेनेने भावनाशून्यपणे मराठा मोर्चाची खिल्ली उडवली. कर्तव्यशून्य होता हे गायकवाड आयोगाची बाजू मांडली नाही यावरुन सिद्ध झालं. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण स्थगिती नाकारली, त्या गायकवाड आयोगाला तुम्ही गाळात टाकलंत. आता मराठा समाजाला आर्थिक मागासलेपणमध्ये टाकलं असलं तरी सामाजिक मागासलेपण गाळू नका, असं आवाहन त्यांनी सरकारला केले.

अतिरिक्त आरक्षणाचा खून पाडला

ओबीसी राजकीय आरक्षण टिकू शकले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थातील अतिरिक्त आरक्षणाचा खून महाविकास आघाडी सरकारने केला. आरक्षणाचा मुडदा पाडल्यानंतर वडेट्टीवार-भूजबळ हे सत्तेत मदमस्त कसे राहू शकतात ?. ओबीसींच्या आरक्षणाला नख लागू नेये, ही आमची भूमिका आहे, असेही आशिष शेलार म्हणाले.

पुणे-सोलापूर रस्त्यावरील प्रसिद्ध हॉटेल कांचनला भीषण आग

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभुमीवर आपल्या मुलांना फ्लूची लस देणं कशामुळं महत्वाचं?

रुसून माहेरी गेलेल्या पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने केले असे काही की…

खा. सुप्रिया सुळेंचा थेट सवाल, म्हणाल्या – ‘मुख्यमंत्रिपद मिळावं यात गैर काय?’

भारतीय हवामान खात्याचा सुधारीत अंदाज ! यंदा 101 टक्के पाऊस पडणार, जाणून घ्या कोणत्या भागात किती पाऊस