बहुजननामा ऑनलाईन टीम – तुमचा चेहरा सुद्धा आरोग्याबाबत अनेक गोष्टी सांगत असतो. जसे की आनंद झाल्यास चेहरा ग्लो होऊ (Face Reveals About Your Body) लागतो. तर, थकवा, दु:ख किंवा आजारी असल्यास चेहर्यावरील तेजी गायब होते. याशिवाय चेहरा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी तुमच्या अंतर्गत आरोग्याच्या स्थितीबाबत (Face Reveals About Your Body) सांगत असतो. याबाबत जाणून घेवूयात…
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पिवळा चेहरा आणि डोळे –
हे काविळीचे खास लक्षण आहे. शरीरात खुप टाकाऊ पदार्थ जमा झाल्याने आणि लाल रक्तपेशी तुटल्याने चेहरा आणि डोळे पिवळे दिसतात. काविळीशिवाय वायरल इन्फेक्शन, लिव्हर, गाल ब्लॅडर, पॅनक्रियाज डिसऑर्डर किंवा लिव्हर सिरोसिसशी संबंधीत सुद्धा समस्या असू शकते.
चेहर्याचे केस गळणे –
जर तुमच्या पापण्या किंवा भुवयांचे केस गळत असतील किंवा चेहर्याच्या केसांवर पॅच येत असेल तर हे एलोपेसिया एरीटाचा संकेत असू शकतो. हे तेव्हा होते जेव्हा इम्यून सिस्टम हेयर फॉलिकल म्हणजे त्वचेच्या आतील भागाला निशाणा बनवते. डॉक्टर यासाठी हेयर फॉलिकल बनवणारी काही औषधे देतात.
सूजलेले डोळे –
सामन्यपणे डोळ्याच्या खालच्या बाजूला आढळणार्या लिक्विडमुळे डोळ्यांची सूज दिसते. याशिवाय सूजलेल्या डोळ्यांचे दुसरेही कारण आहे जसे की, अपूर्ण झोप, जास्त मीठ खाणे, हार्मोनल बदल, गरम हवामान, वृद्धत्व, अॅलर्जी, मेकअप किंवा डोळ्यात साबण गेल्याने डोळ्यांना सूज येते.
चेहर्यावर अनावश्यक केस वाढणे –
चेहर्यावर विचित्र आणि वाईट प्रकारे केस उगवतात. काही पुरुषांचे कानाचे आणि भूवयांच्या जवळपासचे केस वाढू लागतात. तर काही महिलांच्या हनवुटीवर येऊ लागतात. ही स्थिती इतकी गंभीर नाही परंतु महिलांमध्ये हा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) चा संकेत असू शकतो.
ओठ सूकणे आणि रक्त येणे –
सामान्यपणे हिवाळ्यात ओठ फाटतात. मात्र असे डिहायड्रेशन, अॅलर्जी किंवा एखाद्या औषधाच्या रिअॅक्शनमुळे होऊ शकते.
तिळ किंवा मस –
तिळ किंवा मस हे चिंतेचे कारण नाही. कारण बहुतांश लोकांना हे जन्मताच असते. मात्र तिळ किंवा मसच्या रंगात किंवा आकारात एखादा बदल किंवा वेदना जाणवल्यास डॉक्टरांशी संपर्क करा, हे कॅन्सरचे लक्षण असू शकते.
फोड/दाणे –
चेहर्यावर वारंवार होणारे फोड किंवा दाणे हर्पीस सिम्पलेक्स व्हायरसमुळे होऊ शकते. तोंडावर होणारा हर्पीस एक संसर्गजन्य रोग आहे. जो लाळ किंवा शरीरातील द्रव पदार्थामुळे पसरतो.
पापण्या लोंबकळणे –
या स्थितीला ब्लेफेरोप्टोसिस सुद्धा म्हणतात. यामुळे डोळ्याने कमी दिसते. काही लोकांना हे जन्मताच असते आणि यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. मात्र काही लोकांमध्ये हे मेंदू, नस किंवा आय सॉकेटमध्ये समस्येचा संकेत आहे. कमजोर मांसपेशी, गिळण्यास त्रास, डोकेदुखी, दुहेरी दिसणे अशी लक्षणे असतील तर डॉक्टरांकडे जा.
पापणीवर सफेद गाठ येणे –
काही लोकांच्या पापणीच्या जवळपास सफेद डाग किंवा गाठ तयार होऊ लागते. यास जँथिलास्मा सुद्धा म्हणतात. हे हाय कोलेस्ट्रॉलमुळे होते. यात वेदना होत नाहीत आणि औषधाने जाते. कधी-कधी हृदयाशी संबंधीत आजार किंवा हार्ट अटॅकचा सुद्धा संकेत देतात.
डाग –
अनेक लोकांच्या चेहर्यावर सफेद-तपकीरी रंगाचे बारीक बारीक डाग येण्याची समस्या असते. हे प्रग्नंसी किंवा काही औषधांमुळे हार्मोन्समध्ये होणार्या बदलाने होते. डिलिव्हरीनंतर किंवा काही खास औषधे बंद केल्यानंतर हे आपोआप बरे होते.
Web Title : face reveals about your body things your face reveals about your body
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Talegaon Dabhade Police | प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई, 39 लाखांचा मुद्देमाल जप्त