नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्दी-ताप, खोकला, अंगदुखी, नाक वाहणे, घशात खवखव आणि दुखणे – ही सर्व कोरोना व्हायरसची लक्षणे आहेत तसेच सामान्य वायरल ताप किंवा सर्दीची सुद्धा आहेत. या कारणामुळे अनेकदा यामध्ये फरक करणे अवघड होते. मात्र, आता कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेत रोज याची नवनवीन लक्षणे समोर येत आहेत. खुप जास्त थकवा जाणवणे, डायरिया आणि डोकेदुखीनंतर आता रूग्णाच्या प्लेटलेट्समध्ये अचानक घट होणे हे सुद्धा कोविड-19 चे एक लक्षण आहे.
प्लेटलेट काऊंट कमी होऊन 20 हजारवर
टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, लखनऊच्या 60 वर्षांच्या अलीम शेख यांनी बराच काळ थकवा जाणवत असल्याने 18 एप्रिलला ब्लड टेस्ट केली तर रक्तात प्लेटलेट्सची संख्या 85 हजार आढळली, तर सामान्य रूग्णांमध्ये 1.5 लाख ते 4.5 लाखपर्यंत प्लेटलेट्स असतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांनी औषध घेण्यास सुरूवात केली परंतु 23 एप्रिलला त्यांना धाप लागू लागली. पुन्हा ब्लड टेस्ट झाल्यानंतर त्यांच्या प्लेटलेट 20 हजारावर पोहचल्या होत्या. कुटुंबियांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु ऑक्सीजन सपोर्टवाला बेड नसल्याने त्यांचा मृत्यू झाला.
लखनऊच्याच 59 वर्षांच्या राजकुमार रस्तोगी यांनाही थकवा जाणवत असल्याने त्यांनी 13 एप्रिलला ब्लड टेस्ट केली असता त्यांच्या प्लेटलेट केवळ 21 हजार होत्या. औषधांनी सुधारणा न झाल्याने 16 एप्रिलला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि सीटी स्कॅनमध्ये समजले की, त्यांना कोविड निमोनिया होता.
फुफ्फुसात इन्फेक्शन वाढल्याने 20 एप्रिलला राजकुमार यांचा मृत्यू झाला. राजकुमार यांच्या मुलाने सांगितले की, वडीलांमध्ये सूका खोकला किंवा धाप लागण्याची लक्षणे नव्हती.
लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीत रेस्पिरेटरी मेडिसिन विभागाचे प्रोफेसर संतोष कुमार यांनी सांगितले की, थकवा, डायरिया, डोळे लाल होणे, स्किनवर रॅशेस असलयास लोकांनी कोविड-19 ची टेस्ट करून घ्यावी.