बहुजननामा ऑनलाईन – डोबिंवलीच्या मानपाडा चौकात “ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा” असे टी शर्ट घालून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते ईव्हीएम च्या प्रतिकृतीची दहीहंडी फोडणार आहे. इव्हीएम मशीनच्या विरोधात ही दहीहंडी फोडणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीसांनी डोंबिवलीचे मनसेचे शहराध्यभ राजेश कदम यांना नोटीस पाठविली आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ प्रमाणे त्यांना ही नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
पोलीसांनी नोटीस बजावली असतानाही हंडी फोडणारच असा ईशारा मनसेने दिला आहे. त्या पार्श्वभुमीवर डोंबिवलीच्या मानपाडा चौकात पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. खरेतर मानपाडाची दहीहंडी जल्लोषात फुटते. पण दहीहंडीला होणरा खर्च टाळून राज्यातील पुरग्रस्त भागाला मनसेने मदत पाठविली आहे. आता ही दंहीहंडी फुटणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची चौकशी करणाऱ्या ईडीलाच आता ‘मनसे’ने नोटीस पाठवली आहे. ईडीच्या कार्यालयावरील हिंदी आणि इंग्रजी भाषेतील फलक मराठीतही असायला पाहिजे, अशी मागणी ‘मनसे’ने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. राज्यातील सरकारी कार्यालयांवरचे फलक हे मराठीतच असालला पाहिजेत, असा नियम आहे. त्यामुळे ‘मनसे’ने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत त्याची एक प्रत ईडीला पाठविली आहे. आता राज्याच्या मराठी भाषा विभागानेही त्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ‘मनसे’ने केली आहे. राज ठाकरे गुरुवारी रात्री आठ नंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले. ईडीने तब्बल पावणे नऊ तास त्यांची चौकशी केली.मात्र राज ठाकरे यांनी ईडीला पूर्ण सहकार्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.