नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO | तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्याकडे भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ खाते असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वास्तविक, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ग्राहकांना घरी बसून बँक अकाऊंट (Bank Account) अपडेट करण्याची परवानगी देते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे बँक खाते पीएफ खात्यासोबत अगदी सहजपणे अपडेट करू शकता.
बँक खात्याची माहिती अपडेट न केल्यामुळे, तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकणार नाही. बर्याच वेळा असे घडते की ग्राहकांनी पीएफ खात्याशी जोडलेले बँक खाते बंद केलेले असते, आणि नवीन बँक खाते पीएफ खात्याशी जोडण्यास विसरले जाते. जर तुमचा जुना किंवा चुकीचा खाते क्रमांक ईपीएफमध्ये नोंदणीकृत असेल, तर तुम्ही युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) द्वारे तुमचे नवीन बँक खाते सहजपणे अपडेट करू शकता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
असे अपडेट करा बँक खाते
– सर्वप्रथम EPFO चे अधिकृत युनिफाईड सदस्य पोर्टलवर जा https://unifiedportal-mem.
– येथे UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
– आता वरच्या मेनूमधील ’मॅनेज’ पर्यायावर जा, त्यानंतर ड्रॉप डाऊन मेनूमधून ’केवायसी’ निवडा.
– आता तुमची बँक निवडा आणि बँक खाते क्रमांक, नाव आणि IFSC कोड टाकून ’Save’ वर क्लिक करा. आता तुमची विनंती KYC Pending for Approval म्हणून दर्शविली जाईल.
– त्यानंतर संबंधित कागदपत्रे तुमच्या मालकाकडे जमा करा.
– ही माहिती नियोक्त्याने मंजूर केल्यानंतर, तुमचे अपडेट केलेले बँक तपशील डिजिटली अप्रुव्हड केवायसी दाखवले जाईल.
युनिव्हर्सल अकाऊंट नंबर नंबर म्हणजे काय
युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) हा 12 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे.
हा क्रमांक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने दिला आहे.
विशेष म्हणजे एखाद्या कर्मचार्याने त्याच्या हयातीत नोकरी बदलली तरी त्याचा UAN तसाच राहील.
Web Title :- EPFO | pf news want update bank details with epfo step by guide to do it online using UAN.