पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यात राहणारा इंजिनियरिंग कॉलेजचा विद्यार्थी निहाल सिंह आदर्श याने असा डिव्हाईस तयार केला आहे जो पीपीई किट घालणार्या व्यक्तीला थंडावा पोहचवत राहील. हा डिव्हाईस बनवण्यासाठी मे 2020 मध्ये मुंबईच्या के.जे. सोमय्या इंजिनियरिंग कॉलेजने एक प्रोजेक्ट सुरू केला होता. डिव्हाईस बनवण्यासाठी त्याच्या शिक्षकांनी त्याला मदत केली आहे.
निहालने माहिती देताना सांगितले की, मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत होतो. मी पाहिले की, कोविड रूग्णांचा उपचार करणार्या डॉक्टरांना पीपीई किटमध्ये खुप त्रास होतो. यासाठी मी या डिव्हाईसबाबत विचार केला. माझी कल्पना कॉलेजने सिलेक्ट केली आणि परवानगी दिली की मी पुण्यातून मुंबई कॉलेजमध्ये लॉकडाऊनदरम्यान या प्रोजेक्टवर काम करू शकतो.
Maharashtra | Nihaal Singh Adarsh, an engineering student from Pune, has developed 'Cov-Tech', a compact ventilation system for PPE kits
"It is hot & humid within PPE suit, this system creates a steady airflow. Takes surrounding air, filters & pushes it inside," he said (24.05) pic.twitter.com/ARveNj59Jv
— ANI (@ANI) May 24, 2021
साडेचार हजार रुपयांचा डिव्हाईस
निहालने सांगितले की, पीपीई किट एकवेळच्या वापरानंतर बदलला तरी हा डिव्हाईस पुन्हा दुसर्या किटसाठी सतत वापरता येतो. या डिव्हाईसची किंमत जवळपास साडेचार हजार रूपये आहे आणि तो सहजपणे पीपीई किटमध्ये फिट करता येतो. हा डिव्हाईस केवळ 100 सेकंदात आत वापरकर्त्याला ताजी हवा देतो. कूलिंग पीपीई किट तयार करण्याबाबत निहालने म्हटले की, हा मी केवळ माझी आई डॉ. पूनम कौर आदर्श यांना दिलासा देण्यासाठी बनवला होता, जी आदर्श क्लिनिक, पुणेमध्ये कोविड -19 रूग्णांचा उपचार करत आहे. हे क्लिनिक त्या स्वता चालवतात.