नांदेड: (माधव मेकेवाड), बहुजननामा ऑनलाईन – कोरोना विषाणूने नांदेड जिल्ह्यातून जाता जाता जिल्ह्याचा ९ पोलीस कर्मचाऱ्यांना हिरावून नेला आहे. उस्मानगर येथील गंगाधर संभाजी गजभारे यांचे आज सकाळी कोरोना बाधेने निधन झाले आहे.
नांदेड जिल्ह्यातून कोरोना आता जात आहे अशी चिन्हे दिसत आहेत.पण अद्याप त्याला पूर्ण विराम लागलेला नाही. उस्मानगर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी गंगाधर संभाजी गजभारे (५४) यांचे आज कोरोना बाधेने दुर्दैवी निधन झाले आहे.नांदेड जिल्ह्यातील गजभारे हे नववे पोलीस आहेत ज्यांना कोरोना बाधेने आपल्या सोबत नेले आहे.यापूर्वी ८ पोलीस कर्मचारी मृत्यू कोरोना बाधेने झाला आहे. ११ मे रोजी गजभारे यांची कोरोना बाधा पॉझीटिव्ह आली होती.