Eknath Khadse | ‘बावनकुळे स्पष्ट बोलणारा माणूस…’ एकनाथ खडसेंनी बानवकुळेंच्या ‘त्या’ विधानावरुन शिवसेनेला डिवचलं

Eknath Khadse | eknath khadse has criticized shivsena on a statement of bjp state president chandrashekhar bawankule

जळगाव : बहुजननामा ऑनलाईन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची भाजपसोबत युती (Shiv Sena BJP Alliance) आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Elections-2024) भाजप ठाकरे ब्रँडशिवाय असलेल्या शिवसेनेला कसं स्थान देणार, यावरुन तर्क-वितर्क लढवले जात असताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी निवडणुकीत भाजप 240 जागा लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मात्र बावनकुळे यांचे कौतुक केले आहे. बावनकुळे हे मनमोकळ्या मनाचा आणि स्पष्ट बोलणारा माणूस असल्याचे खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुक करताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले, बावनकुळे मनमोकळ्या मानाचा आणि स्पष्ट बोलणारा माणूस आहे. त्यांच्या कधी ओठात एक आणि पोटात दुसरं असं नाही. कार्यकर्त्यांसमोर स्पष्टपणे त्यांनी त्यांची सत्य भूमिका मांडली. यावरुन असं दिसतंय की शिवसेना शिंदे गटाकडे (Shinde Group) भाजप दुर्लक्ष करत आहे. पुढच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये (Lok Sabha Elections-2024) शिंदे गटाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम भाजप करेल, असा टोला खडसेंनी लगावला.

 

288 पैकी 48 जागा ह्या शिवसेनेच्या शिंदे गटाला आणि उरलेल्या 240 जागा भाजपला.
शिंदे गटाकडे सध्या 40-42 जागा आहेत. त्या लढवायच्या आणि 10-12 जागा निवडून अणायच्या.
बावनकुळेंनी मांडलेली भूमिका स्पष्ट आहे. शिंदे गट हा महाराष्ट्रात लहानसा गट आहे,
असा थेट हल्लाबोल एकनाथ खडसेंनी केला.

 

 

काय म्हणाले बानवकुळे?

एका खासगी कार्यक्रमात बोलताना बावनकुळे यांनी शिवसेना-भाजपमधील संभाव्य जागावाटपचा फॉर्म्युला
जाहीर केला होता. 2024 मध्ये भाजपचे 150 ते 170 आमदार 100 टक्के निवडून येतील.
आपण 240 च्या आसपास सीट लढवण्याचा विचार करत आहोत. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे 50 पेक्षा
जास्त आमदारच नाहीत, असे बावनकुळे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची क्लिप काही वेळात सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Eknath Khadse | eknath khadse has criticized shivsena on a statement of bjp state president chandrashekhar bawankule

 

हे देखील वाचा :

Ram Charan | अभिनेता रामचरण लवकरच झळकणार हॉलीवुडमध्ये; एका मुलाखती दरम्यान अभिनेत्यानेच केला खुलासा

KRK | मनोज वाजपेयी विरुद्ध केलेल्या ‘त्या’ ट्विटमुळे केआरके विरोधात अटक वॉरंट जारी

24×7 Water Supply – Pune PMC | समान पाणीपुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करा – चंद्रकांत पाटील

Buldhana Crime News | गुंगीचं औषध देऊन 50 वर्षीय नराधमाकडून 15 वर्षीय मुलीवर अत्याचार