सावंतवाडी : बहुजननामा ऑनलाईन – सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर गोवा हद्दीतील एका बंगल्यावर ईडीने रविवारी (दि. 28) छापा टाकला आहे. घरांची तब्बल दोन तासांपासून झडती घेतली जात असून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. सदर बंगला कर्नाटकमधील उद्योगपतीचा असल्याचे सांगितले जात आहे. खाण घोटाळ्याच्या संबधित ही कारवाई असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान ऐन होळीच्या दिवशीच कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
कर्नाटकातील एका उद्योगपतीचे फार्महाऊस या परिसरात आहे. बंगलोर येथील ईडीच्या पथकाने बंगल्यावर छापा टाकून झाडाझडती सुरू केली आहे. त्यावेळी बंगल्याची देखभाल करण्यासाठी असलेले दाम्पत्य त्याठिकाणी होते. स्थानिक गोवा पोलिसांना देखील याची माहिती नसल्याचे समोर आले आहे. कारवाईत काय हाती लागले हे समजू शकले नाही.