नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका देशाचे राष्ट्रपती असे म्हणतात की महिला लैंगिक छळाबद्दलची तक्रार तेव्हा करता जेव्हा बलात्कार करणारा पुरुष कुरुप दिसतो. मग लोक त्याच्याबद्दल काय विचार करतील ? अशा टिप्पण्यांनंतर जगातील लोक या राष्ट्रपतींना शिव्याशाप देतात. या राष्ट्रपतीचे वक्तव्य सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. चला हे कोण आहेत ते जाणून घेऊया ? त्यांनी काय वादग्रस्त विधान केले ? हे इक्वाडोरचे राष्ट्रपती लेनिन मोरेनो आहेत. इक्वाडोरच्या गुआयाक्विल सिटी येथे आयोजित इकॉनॉमिक्स कॉन्फरन्स दरम्यान ते म्हणाले की, लैंगिक शोषणाचे आरोप नेहमी वाईट दिसणार्या पुरुषांसाठी अधिक धोकादायक असतात. तर, सुंदर असलेल्या पुरुषांसाठी हा धोका कमी आहे.
इक्वाडोरच्या एका वृत्तपत्राने लिहिले की लेनिन मोरेनो यांनी या गोष्टीवर जोर दिला आहे की, लैंगिक शोषणाविरूद्ध महिला आवाज उठवत आहेत ही चांगली गोष्ट आहे. पण कधी कधी वाईट दिसणार्या किंवा गलिच्छ दिसणार्या पुरुषांवर महिला नाराज होतात. त्यानंतर तक्रार करतात.
लेनिन मोरेनो म्हणाले की महिला कुरुप दिसणाऱ्या पुरुषांवर लैंगिक शोषणाचे आरोप करतात पण त्यांना सुंदर आणि हुशार पुरुषांशी जोडलेले संबंध त्यांना लैंगिक संबंध वाटत नाही. बर्याच वेळा आपण अशी प्रकरणे मुद्दाम वाढवून सांगतात. लेनिन मोरेनो सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. यानंतर लेनिन मोरेनो यांनी ट्वीट करून म्हटले आहे की लैंगिक अत्याचाराबाबत मी केलेले वक्तव्याचा लोक गैरअर्थ काढत आहेत. मी या विषयाच्या गंभीरतेला कमी लेखत नाही. पण जर कोणाला माझे बोलणे चुकीचे वाटत असेल तर मी माफी मागतो.