जयपूर :वृत्तसंस्था – Earthquake |राजस्थानातील (Rajasthan) बिकानेर (Bikaner) परिसरात आज सकाळी ७ वाजून ४२ मिनिटांनी भुकंपाचा (Earthquake) पुन्हा एकदा जोरदार झटका जाणवला. गेल्या २४ तासातील हा दुसर्या भुकंपाचा (Earthquake) धक्का असल्याचे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
या भुकंपाची रिश्टर स्केलवर तीव्रता ४.८ इतकी नोंदविली गेली आहे. या भुकंपाचा केंद्रबिंदू कालच्या प्रमाणे आजही पाकिस्तान(Pakistan)मध्ये आहे. २९.६५ आणि ६९.५० अक्षांश आणि रेखांक्षावर १५ किमी खोल या भुकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे राष्ट्रीय विज्ञान केंद्राने (National Center for Seismology) म्हटले आहे. या भुकंपाचा केंद्रबिंदू बिकानेरपासून ४१३ किलोमीटर दूर आहे. जोधपूरपासून ५१३ किमी आणि काबुलपासून ५४६ किमी दूर आहे.
https://twitter.com/ANI/
पाकिस्तानातील विविध भागातही या भुकंपाचा झटका जाणवला. या भागात नेहमीच भुकंपाचे धक्के
जाणवत असतात. बुधवारी बिकानेरमध्ये पहाटे ५ वाजून २४ मिनिटांनी ५.३ रेश्टर स्केलचा भुकंपाचा
धक्का जाणवला होता. या भुकंपाच्या केंद्रबिंदूजवळच आजच्या भुकंपाचा केंद्रबिंदू आहे. आजची भुकंपाची तीव्रता कालच्या पेक्षा कमी होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
web title: Earthquake | Second earthquake shakes Bikaner in 24 hours; Pakistan was the epicenter, with no reports of casualties yet
Youtube करणार कंटेन्ट क्रिएटर्सला मालामाल, लाँच केले ‘हे’ जबरदस्त फिचर; जाणून घ्या