बहुजननामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड अॅक्ट्रेस भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) चा दुर्गामती : द मिथ (Durgamati : The Myth) हा सिनेमा 11 डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video) वर रिलीज झाला आहे.
जेव्हा सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा असं वाटलं होतं की, यात भूमीचा दमदार अभिनय आणि डायलॉग असेल. यात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स असतील. ट्रेलरनं खूप उत्सुकता वाढवली होती. फक्त हे पाहायचं होतं की, सिनेमा चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरतो की नाही.
स्टोरी
झाडावर लटकणारा मृतदेह, पायऱ्यांवर पडलेली महिला आणि जीव वाचवण्यासाठी पळणारी मुलं. हा दुर्गामतीचा सुरुवातीचा सेटअप आहे जो पाहिल्यानंतर धडधड वाढते. बॅकग्राऊंड स्कोरही चांगला आहे. हे सर्व एका गावातील एका जुन्या हवेलीत होत असतात. राणी दुर्गामतीची हवेली. यात खुन झालेल्या दुर्गामातीचा आत्मा भटकत असतो असं सांगितलं जात असतं. गावकरी याच्या आसपास भटकतही नाहीत. हा आहे पहिला प्लॉट
यात अरशद वारसीनं जल संसाधनमंत्री ईश्वर प्रसादची भूमिका साकारली आहे. त्यांनी आपल्याच सरकार विरोधात त्यांनी आवाज उठवला आहे. त्यांनी एक इमानदार आणि मसीहा अशी इमेज बनवली आहे. एक अशी केस सुरू असते ज्यात प्राचीन मंदिरातून मुर्ती गायब होत आहेत. यामुळं गावकरी नाराज आहेत आणि सरकारची इमेज खराब होत आहे. हा दुसरा प्लॉट.
तिसऱ्या प्लॉटमध्ये आपली चंचल कुमार (भूमी पेडणेकर) सोबत ओळख होते. ती एक IAS अधिकारी असते. चंचल खूप मोठ्या अडचणीत सापडते. तिनं तिचा प्रेमी आणि लोकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शक्ती (करण कपाडिया) ला गोळी मारली आहे. त्यामुळं तिला जेलची हवा खावी लागते.
आता येथो चौथा प्लॉट ज्यात आपण अशा सीबीआय ऑफिसरला (माही गिल) भेटतो जिला ईश्वर प्रसादला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात फसवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अशात चंचलची चौकशी करण्यासाठी तिला दुर्गामती हवेलीत नेलं जातं. कारण हे सगळं गुपचूप करायचं होतं. ती अरशदच्या जवळची राहिलेली असते. म्हणून तिची चौकशी करायची असते.
ही आहे सिनेमाची स्टोरी. पुढं काय काय होतं याची उत्सुकता असेल आणि ते जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला डायरेक्टर अशोकचा हा सिनेमा पहावा लागेल.