मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून (Presidential Election) राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) असलेल्या शिवसेनेनं एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा दिला आहे. मात्र एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानी ‘मातोश्री’ वर (Matoshri) जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आता चार दिवस उरले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेच्या खासदारांच्या (Shivsena MP) गटाने दबाव निर्माण केला होता. खासदारांनी उघडपणे एनडीएच्या उमेदवार (NDA Candidate) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय जाहिर केला होता. त्यामुळे आभार व्यक्त करण्यासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या मातोश्रीवर जाणार असल्याची चर्चा होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पण, एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या मुंबईत दाखल झाल्या असून उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर जाणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
शिवसेनेने पाठिंबा जाहीर केल्यानंतर मुर्मू मातोश्रीवर जाणार अशी चर्चा सुरु होती.
मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
विशेष म्हणजे, एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आज दुपारी शिंदे गटाला (Shinde Group) भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Web Title :- Draupadi Murmu | nda candidate draupadi murmu will not go to matokshi to meet uddhav thackeray
हे देखील वाचा :
Shivsena MP Sanjay Raut | ‘राज्यात सरकार अस्तित्वात नाही, राज्यपाल कुठे आहेत ?’ – संजय राऊत