पुणे : बहुजननामा ऑनलाइन – भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई यांनी प्रकाश आंबेडकरांना एकत्रित लढण्याचे आवाहन केले आहे. पण त्यांनी नकार दिला याचे मला नवल वाटले असे गवई म्हणाले. मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहे कारण आमच्या दोघांचे मार्ग एक आहेत. पण त्यांनी मला नकार का दिला हे मला समजले नाही.
मी माझ्याच मतदार संघात ( अमरावतीत ) माझ्याच चिन्हांवर निवडणूक लढणार आहे. मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट घातली आहे. पण मला ती मान्य नाही. अमरावती माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. जागावाटपात मी माझा मतदार संघ कोणाला सोडणार नाही असे गवई यांनी सांगितले.