बहुजननामा ऑनलाइन टीम – दिवाळी(Diwali ) सिजनमध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या ऑफर्स देत असतात. त्यामुळे दिवाळीच्या( Diwali) या सिजनमध्ये तुम्ही मोबाइल( Mobile) घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही संधी सोडू नका. ॲमेझॉन (amazon) आणि फ्लिपकार्टवर ( Filpkart) सध्या सेल सुरु आहे. ॲपल, सॅमसंग, मोटोरोला यांसारख्या मोठ्या ब्रँड्सवर 40 हजार रूपयांपर्यंतची मोठी सूट मिळत आहे. आयफोन असो किंवा सॅमसंग गॅलक्सी नोट 10 सर्वच फोन्सवर बंम्पर डिस्काउंट ( Discount) मिळत आहे. ऑफरसोबतच बँक कॉर्ड्सवर एक्स्ट्रा डिस्काउंट दिला जात आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मोबाइलविषयी सांगणार आहोत.
१)Apple iPhone SE 2020 :
फ्लिपकार्ट वरील या सेलमध्ये तुम्हाला iPhone SE 2020 वर 9,501 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. 42,500 रूपये किंमतीत लॉन्च करण्यात आलेल्या हा स्मार्टफोन तुम्ही केवळ 32,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकणार आहात. या फोनच्या 64GB मॉडेलवर 14,350 रुपयांची एक्सेंज ऑफर दिली जात आहे. त्याचबरोबर ऍक्सिस बँकेच्या कार्डवर ग्राहकांना १५०० रुपयांचा डिस्काउंट देखील मिळत आहे.
२)Motorola Razr 2019 :
मोटोरोलाच्या या फोनवर जवळपास ४० हजार रुपयांचा डिस्काउंट देण्यात आला आहे. हा फोन तुम्हाला या सेलमध्ये 84,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. या फोनची मूळ किंमत 1,24,999 रुपये आहे. कंपनी 14,500 रुपयांची एक्सेंज ऑफर आणि 2,542 रुपये प्रति महिन्याच्या दराने नो-कॉस्ट ईएमआयची ऑफरही युजर्सना देत आहे. त्यामुळे या सेलमधून तुम्ही हा फोन खरेदी करू शकता.
३)Samsung Galaxy S20+ :
सध्या या फोनची किंमत 24,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 49,999 रुपयांमध्ये (8GB RAM + 128GB) युजर्सना खरेदी करता येऊ शकतो. याआधी या फोनची किंमत 73,999 रुपये होती. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनच्या खेरदीवर 14,850 रूपयांची एक्सेंज ऑफरही देण्यात येऊ शकते. फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेड प्लॅनमध्ये तुम्हाला 15,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळणार आहे.
४)Samsung Galaxy Note 10+ :
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा फोन तुम्हाला 59,999 (12GB RAM + 256GB) रुपयांना खरेदी करता येऊ शकते. याची किंमत 79,999 रुपये आहे. पण सध्या या फोनवर 20,000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. या फोनच्या खेरदीवर फ्लिपकार्ट युजर्सना 14,580 रुपयांपर्यंतचा एक्सेंज ऑफर देत आहे. त्याचबरोबर नो कॉस्ट ईएमआय वर देखील तुम्ही खरेदी करू शकता.
५)Samsung Galaxy M51 :
अमेझॉनच्या सेलमध्ये तुम्हाला हा फोन 24,999 रुपयांऐवजी 22,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. सिटी बँक, कोटक बँक आणि आयसीआयसीआय कार्ट धारकांसाठी 3,000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंटही दिला जात आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये 7,000mAh क्षमतेची बॅटरी आहे. विविध कार्डच्या ऑफरचा तुम्ही फायदा घेतल्यास तुम्हाला हा फोन २० हजार रुपयांपेक्षा कमी मिळू शकतो.
६)Realme Narzo 20 Pro :
फ्लिपकार्टवरील सेलमध्ये हा फोन तुम्ही 13,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. 6GB RAM + 64GB व्हेरियंट तुम्ही १४ हजार रुपयांच्या आतमध्ये खरेदी करू शकता. या फोनमध्ये तुम्हाला 6.5 इंचांच्या फुल एचडी प्लस डिस्प्ले पॅनलसोबत येतो. त्याचबरोबर MediaTek Helio G95 SoC प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. फोनला पावर देण्यासाठी यामध्ये 4,500mAh बॅटरी आणि 65W ची सुपरडार्ट फास्ट चार्जिंग फिचर आहे. त्यामुळे या किमतीत उत्तम फीचर्स तुम्हाला कोणत्याच फोनमध्ये मिळणार नाहीत.