पुणे: Dilip Mohite Patil On Jogendra Katyare | खेड आळंदीचे प्रांताधिकारी (Khed Alandi Prantadhikari) आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत पुण्याचे जिल्ह्याधिकारी (Pune Collector) सुहास दिवसे (Suhas Diwase) हे खेड आळंदीचे आमदार यांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप केला.
“सुहास दिवसे हे अनेक वर्षे कृषी आयुक्त, क्रिडा आयुक्त, पीएमआरडीए चे संचालक अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून आहेत. तसेच सुहास दिवसे हे जाणीवपूर्वक आपल्याला त्रास देत आहेत.
आमदार त्यांचे हितसंबध जोपसण्यासाठी दिवसे यांचा वापर करत आहेत. सुहास दिवसे यांनी माझ्या कार्यकाळात झालेल्या जमिन अधिग्रहण प्रकरणांची आधीच चौकशी सुरू केलेली असताना २८ मे रोजी त्यांनी खेडच्या तहसील कार्यालयात पुन्हा छापा घातला. सुहास दिवसे यांनी हे सर्व खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावातून केले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. (Lok Sabha Election 2024)
कट्यारेंनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर गंभीर आरोप केले. याबाबत आता अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंनी प्रतिक्रिया देत प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांच्यावरच निशाणा साधला आहे.
ते म्हणाले की, पुण्यातील खेड-राजगुरूनगरचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारेंनी कायतरी पाप केलंय, म्हणूनच मी आत्महत्या करेन, अशी धमकी त्यांना द्यावी लागत आहे. सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी. येत्या अधिवेशनात मी प्रांताधिकारी कट्यारे आणि तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याबाबतचा हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचा इशारा ही मोहितेंनी दिला आहे.