Pune Crime News | पुणे : लष्कर भरतीसाठी पैशांची मागणी, CBI कडून लेफ्टनंट कर्नलवर गुन्हा दाखल
पुणे : – Pune Crime News | लष्करात भरती (Lure Of Jobs In Army) करण्यासाठी पैशांची मागणी केल्याप्रकरणी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील (Southern Command) तात्कालीन लेफ्टनंट कर्नल विरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने Central Bureau of Investigation (CBI) गुन्हा दाखल केला आहे. तत्कालीन लेफ्टनंट कर्नल विकास रायझादा (Lt Colonel Vikash Raizada) आणि सुशांत नाहक (Sushant Nahak) यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर कट रचणे, फसवणूक करणे तसेच भ्रष्टाचार विरोधी कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Army Recruitment Exam Fraud)
16 नोव्हेंबर 2021 मध्ये सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागितल्याप्रकरणी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील तत्कालीन हवालदार सुशांत नाहक आणि नवीन कुमार यांच्यावर लष्करातील मल्टी टास्किंग भरती प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार सीबीआय विशेष न्यायालयाने नाहक आणि कुमार यांच्या मोबाईल मधील माहितीचे विश्लेषण करण्याचे आदेश सीबीआयला दिल होते. त्यांच्या मोबाईलमध्ये मिळालेल्या माहितीमध्ये नाहक याने भरती प्रक्रियेत निवड झालेल्या आणि निवड न झालेल्या उमेदवारांकडे पैशांची मागणी केल्याचे तपासात समोर आले.
भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षा यादीमध्ये असलेल्या एका उमेदवाराकडे दोन लाख रुपये लाच मागण्यात आली. त्यामुळे त्या उमेदवाराने याबाबत सीबीआयकडे तक्रार दिली होती. सीबीआच्या तपासात सुशांत नाहक आणि कर्नल रायझादा यांनी भरती प्रक्रियेत लाच मागितल्यचे निष्पन्न झाले. रायझादा यांनी निवड झालेल्या उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचे तपासात उघडकीस आले. तसेच ग्रुप सी च्या भरती प्रक्रियेत देखील गैरप्रकार केल्याचे उघडकीस आले.
तपासामध्ये सुशांत नाहक याने एका उमेदवाराकडून 80 हजार रुपये बँक खात्यात जमा करुन घेतले होते. त्यानंतर 75 हजार रुपये रायझादा यांच्या बँक खात्यावर ट्रान्स्फर केले होते. त्यामुळे सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कट रचणे, फसवणूक करणे तसेच भ्रष्टाचाराच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Comments are closed.