बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबई : आज बजेटपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र, मागील 10 महिन्यात पेट्रोलचे दर सुमारे 16 रुपये आणि डिझेलच्या दरात 14 रुपये प्रति लीटरपेक्षा जास्त वाढ झाली आहे. पेट्राल-डिझेलच्या किंमतीत सतत वाढ दिसून येत आहे. या वाढीमुळे महागाई सुद्धा वाढत असते. सध्या इंधनाच्या किंमती उच्च स्तरावर आहेत. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल आता 101 रुपये लीटरवर पोहचले आहे. तर इंदौरमध्ये पेट्रोलची किंमत 94 रुपयांच्या पुढे गेली आहे.
पुणे 92.88 – 82.05
औरंगाबाद 94.10 – 84.54
धुळे 93.51 – 82.69
कोल्हापूर 93.16 – 82.36
नाशिक 93.30 – 82.46
रायगड 93.35 – 82.49
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि अन्य गोष्टी मिळवल्यानंतर दर जवळपास दुप्पट होतात. जर केंद्र सरकारची एक्साइज ड्यूटी आणि राज्य सरकारांचा वॅट हटवला तर डिझेल आणि पेट्रोलचा रेट जवळपास 27 रुपये लीटर राहिल, परंतु केंद्र असो की राज्य सरकार, दोन्ही कोणत्याही स्थितीत टॅक्स कमी करत नाहीत. कारण महसूलाचा एक मोठा भाग येथून येतो.
एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती
तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.
कंपनी आणि क्रमांकाची सुविधा
1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249
2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222
3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122
वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता