Devendra Fadnavis | छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा, देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन, म्हणाले – ‘परिस्थिती नियंत्रणात, सर्वांनी शांतता राखावी’ (व्हिडीओ)

Devendra Fadnavis | chhatrapati sambhaji nagar dispute between two groups first reaction of home minister devendra fadnavis

छत्रपती संभाजीनगर : बहुजननामा ऑनलाईन  रामनवमीच्या (Ram Navami) आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर शहरातील
किराडपुरा (Kiradpura) भागात दोन गटात तणाव (Dispute) निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी (Chhatrapati Sambhaji Nagar
Police) कारवाई केल्यानंतर या भागात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीनगर मध्ये परिस्थिती नियंत्रणात असून सर्वांनी शांतता
राखावी, असं आवाहन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar News) मध्यरात्री दोनच्या सुमारास दोन गटात राडा झाला. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक ठिकाणी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचं बघायला मिळालं. या घटनेबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. याठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र काही लोक याठिकाणी भडकाऊ प्रतिक्रिया देत असून, परिस्थिती आणखी चिघळली पाहिजे यासाठी प्रयत्न करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

 

 

कोणीही चुकीचे स्टेटमेंट देऊ नयेत

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, नेत्यांनी कसं वागलं पाहिजे हे समजावून घ्यावे. कोणीही चुकीचे स्टेटमेंट देऊ नयेत
ही जबाबदारी सगळ्या नेत्यांची आहे. तसेच या घटनेला राजकीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यापेक्षा दुर्दैव काहीच नाही. काही जण चुकीचे बोलत आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. शांतता पाळण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा लागेल, शहरात शांतता ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | chhatrapati sambhaji nagar dispute between two groups first reaction of home minister devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘न्यायालयाने नपुंसक म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?’, अजित पवारांचा सरकारला संतप्त सवाल

Pune Crime News | प्रेमविवाह केल्याने भावानेच मानसिक रुग्ण ठरविण्याचा प्रयत्न करुन बँकेतून घेतले काढून ४ लाख; प्राध्यापक असलेल्या महिलेची तक्रार

ACB Arrest Ranjeet Mahadev Patil | सावकारी कायद्यान्वये कारवाई न करण्यासाठी 20 लाखाची लाच घेणार्‍या सहाय्यक निबंधक रणजीत पाटीलला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक