देवळी/वर्धा : बहुजननामा ऑनलाईन – देवळी-वर्धा मार्गावर झालेल्या विचित्र अपघातात (Deoli-Wardha Road Accident) भंडारा येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा (Retired Police Officer) मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. देवळी-वर्धा रोडवर दोन ट्रक आणि कारचा अपघात (Deoli-Wardha Road Accident) झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनावर समोरुन येणाऱ्या दोन चारचाकी धडकल्याने हा भीषण अपघात झाला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हा अपघात देवळी-वर्धा मार्गावर (Deoli-Wardha Road Accident) बुधवारी (दि.9) सकाळी 11 च्या सुमारास शेतकी शाळेजवळ झाला. सुधाकर चव्हाण Sudhakar Chavan (रा. भंडारा) असे मृत्यू (Death) झालेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. तर मालवाहू ट्रकचालक अंकुश केने आणि 16 चाकी चालक रामेश्वर (रा. राजनांदगाव, छत्तीसगड) अशी जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू मिनी ट्रकचा चालक अंकुश केने वाहन निष्काळजीपणे चालवत विरुद्ध दिशेने देवळीकडे जात होता. त्याचवेळी देवळीकडून वर्ध्याकडे येणारा 16 चाकी मालवाहू ट्रक आणि कार या दोन्ही गाड्यांसमोर मिनी मालवाहू ट्रक आल्याने दोन्ही वाहने अनियंत्रित होऊन मिनी ट्रकवर जाऊन धडकली. या अपघातात दोन्ही ट्रक आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळल्या.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलीस ठाण्याचे (Sawangi Police Station)
पोलीस निरीक्षक धनाजी जळक (Police Inspector Dhanaji Jalak) यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
पंचनामा करुन जखमींना रुग्णालयात पाठवले. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पोलिसांनी आरोपी मिनी मलवाहू ट्रकचालक अंकुश केने याच्या विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Deoli-Wardha Road Accident | strange accident on deoli wardha route retired police officer killed two critical
हे देखील वाचा :
Pune Crime | ‘त्या’ तरुणीचा खून एकतर्फी प्रेमातून, खून करणाऱ्या आरोपीची मुळशीत आत्महत्या