मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशात सध्या कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट ओसरत असली तरी आता धोका आहे तो डेल्टा प्लस व्हेरिएंटचा (Delta Plus variant). देशात या विषाणूने बाधित झालेले रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, कोविड टास्क फोर्सचे (Covid Task Force) प्रमुख व्ही. के पॉल (V. K. Paul) यांनी सांगितल्यानुसार कोरोनाचे ज्या कोरोना पद्धतीने त्याच रूप बदलत आहे त्यावरून महामारीच्या लाटेची निश्चित अशी तारीख सांगता येणार नाही. कोरोनावरील लसीचा प्रभाव डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कमी होत असल्याचा कोणताही आकडा आमच्याकडे नाही. किंबहुना डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत वैज्ञानिक आधार नाही. अनेक गोष्टींवर महामारीची नवी लाट निर्भर असते असे त्यांनी सांगितले.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
व्ही. के पॉल म्हणाले, नियमांचे काटेकोरपणे पालन आणि लसीकरण (Vaccination) करणे एवढेच सध्या तरी कोरोना संसर्गापासून बचाव करण्याची पद्धत आहे. कोरोनाची गतिशीलता हि विषाणूच्या होणाऱ्या बदलामुळे बदलू शकते. पण महामारीची लाट येईल कि नाही हे सांगू शकत नाही. किंवा लाटेसाठी कोणतीही तारीख दिली जाऊ शकत नाही. अथवा नियंत्रणात आणली जाऊ शकते असे सांगणं कठीण आहे. दुसर्या लाटेत संक्रमणाचे प्रमाण अधिक होते. दररोज चार लाखाच्यावर बाधितांची संख्या पोहोचली होती. सध्या हि संख्या घटून पाच हजारच्या आसपास गेली आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांतही निर्बंध शिथिल केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने त्याचा वैज्ञानिक अभ्यास करत आहेत.
या व्हेरिएंटमधील बदल, व्हेरिएंटमुळे संक्रमण वेगाने पसरेल की संक्रमित रुग्णांची गंभीर होण्याची शक्यता आहे.
त्याचसोबत लसीचा प्रभाव कितपत आहे. याबद्दल आताच काही सांगू शकत नाही.
वैज्ञानिकांच्या अहवालाची आणि सूचनांची आपल्याला वाट पाहवी लागेल असेही त्यांनी सांगितले.
Web Title :- Delta Plus variant | does delta plus variant reduce effectiveness vaccine central government explanation
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Actor Ujjwal |अभिनेता उज्वल धनगरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा