नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयात एका युवकाने सिंहाच्या दालनात उडी मारल्याने खळबळ उडाली. दरम्यान, आश्चर्याची बाब म्हणजे सिंह त्या युवकाला काहीही करु शकला नाही आणि तो तरुण यातून सूखरुप बचावला. घटनेच्या वेळी जवळ उभे असलेल्या लोकांनी या युवकाला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या तरुणाने सिंहाच्या तरुणात दालनात उडी घेतली, त्यानंतर तो तरुण आणि सिंह दोघेही आमनेसामने भेटले. पण हे प्रकरण येथेच संपत नाही. यानंतर तो तरुण सिंहाजवळ बसला.
घटनेदरम्यान हा तरुण बराच काळ सिंहाजवळ बसला परंतु सिंहाने त्या युवकाचे काहीच केले नाही. घाईघाईने सुरक्षा कर्मचार्यांनीही बाजुला उडी मारून या युवकाचा जीव वाचविला. मिळालेल्या माहितीनुसार, तो तरुण मानसिकदृष्ट्या दुर्बल आहे. घटनेनंतर या तरूणाला पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. जिथे त्याची चौकशी केली जात होती.
#WATCH Delhi: A man entered into enclosure of a lion at Delhi Zoo after climbing its metal grille. He was later brought out safely. DCP(Southeast)says "He's Rehan Khan, a 28-yr-old man from Bihar. He seems to be mentally unstable.He was immediately brought out without any injury" pic.twitter.com/t5n6bfPx7p
— ANI (@ANI) October 17, 2019
या घटनेसंदर्भात डीसीपी म्हणाले, ‘या युवकाचे नाव रेहान खान (वय २८ ) आहे, जो बिहारचा रहिवासी आहे. तो मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. कोणतीही इजा न करता त्याला त्वरित बाहेर आणले गेले. पूर्व चंपारणमधील हा माणूस सध्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीलमपूर येथे राहत होता. ते वाचविण्यासाठी प्राणीसंग्रहालयातील ४टीम कुंपणात होत्या . ज्यानंतर तो बचावला.
Visit : bahujannama.com