नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपण स्कूटर घेण्याचा प्लॅन करत असाल तर ही तुमच्यासाठी योग्य वेळ आहे, कारण होंडा आपल्या स्कूटरवर फेस्टिव धमाका ऑफर्स घेऊन येत आहे. आपण होंडा स्कूटर विकत घेत असाल तर आपल्यला ११,००० रुपयांपर्यंत बचत करू शकता. याशिवाय पेटीएम कॅशबॅक आणि लो डाउन पेमेंट यासारखे इतर फायदेही ग्राहकांना देत आहेत.
ऑफर्स
ही ऑफर होंडाच्या स्टायलिश स्कूटर Dio वर मिळत आहे. होंडा Dio वर कंपनी तुम्हाला ८,९०० रुपयांच्या बचतीसह २,१०० रुपयांचे इतर लाभ देत आहे. आपण केवळ १,१०० रुपयांच्या लो डाउन करून खरेदी करू शकतात. या व्यतिरिक्त यावर ७,००० रुपयांपर्यंत पेटीएम कॅशबॅक देखील मिळत आहे.
फिचर्स आणि किंमत
होंडा डिओची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत ५३,७७७ रुपये पासून सुरू होते. Dio STD ची किंमत ५३,७७७ रुपये आहे आणि Dio DLX ची किंमत ५५,७७७ रुपये आहे. यात तुम्हाला १०९ सीसी फॅन कूल्ड, ४ स्ट्रोक, एसआय इंजिन मिळेल, जे 8bhp पॉवर आणि ८.९१Nm टॉर्क जनरेट करते. त्याच्या फिचर्सविषयी बोलायचे गेले तर नवीन एलईडी हेडलॅम्प, सिग्नेचर गोल्ड रिम, इको स्पीड इंडिकेटर असलेले फुल डिजिटल मीटर, मोबाइल चार्जिंग सॉकेट, ट्यूबलेस टायर्स, सीट ओपनिंग स्विचसह ४ लॉक इन १ लॉक, स्पोर्टी ग्राफिक्स / ड्युअल टोन कलर आणि सर्व्हिसचा समावेश आहे. ड्यू इंडिकेटर सारखी बरीच आकर्षक फिचर्स आहेत.
Visit : bahujannama.com