नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली पोलिसांनी बंपर भरती काढली आहे. त्याअंतर्गत 5846पदांवर पात्र उमेदवारांची भरती केली जाईल. Delhi Police Constable Recruitment 2020 साठी पुरुष आणि महिला दोन्ही वर्गातील उमेदवार अर्ज करू शकतात.
पदांचा तपशील
एकूण पदे- ५८४६
पुरुषांसाठी पदे- ३९०२
महिलांसाठी पदे- १९४४
दिल्ली पोलिस भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ५२००-२०२०० रुपये पगार दिला जाईल. दिल्ली पोलिस भरती २०२० साठी उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाकडून १२ वी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
वयोमर्यादा
सामान्य वर्ग आणि ईडब्ल्यूएस वर्ग उमेदवारांसाठी १८ ते २५ वर्षे
ओबीसी प्रवर्गासाठी १८ ते २७ वर्षे
एससी/ एसटी वर्गाच्या उमेदवारांसाठी १८ ते ३० वर्षे
या भरतीसाठी जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी म्हणून १०० रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर एससी/ एसटी/ एक्स-एस आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही अर्ज फी निश्चित केलेली नाही.
दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल भरती २०२० शी संबंधित तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच दिल्ली पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर याची माहिती दिली जाईल, त्यानंतर उमेदवार त्यासाठी अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया
या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ऑनलाइन व शारीरिक चाचणीच्या आधारे केली जाईल.