दिल्ली : वृत्तसंस्था – वसईच्या माणिकपूर परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणीची दिल्लीत निर्घूण हत्या (Delhi Crime) झाल्याचा प्रकार पाच महिन्यांनी उघडकीस आला आहे. माणिकपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांमुळे हा प्रकार उघड झाला आहे. (Delhi Crime) दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आरोपीला अटक केली आहे. आफताब पुनावाला (Aftab Poonawala) असे आरोपीचे नाव आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
वसईच्या माणिकपूर परिसरात विजय विहार कॉम्प्लेक्समधील रिगल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकर Shradha Walkar (वय 27) हिचे त्याच परिसरात राहणाऱ्या आफताब पुनावाला याच्यासोबत प्रेमप्रकरण होते. पोलिसांच्या माहितीनुसार, या दोघांनी लग्न केले होते. पण आंतरजातीय विवाह असल्याने मुलीच्या घरी वाद सुरु होते. त्यानंतर दोघेही यावर्षीच्या मे महिन्यात दिल्लीला राहायला गेले होते. दोघेही कॉल सेंटरमध्ये कामाला जात होते. पण पुन्हा त्यांच्यात काही वाद झाले. त्यानंतर अफताबने 18 मे रोजी श्रद्धाचा गळा आवळून तिचा खून (Murder) केला. त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. तुकड्यांची दुर्गंधी येऊ नये, यासाठी आफताबने मोठा फ्रिजर विकत घेतला होता. त्यानंतर तो एक एक अंग महारौलीच्या जंगलात नेऊन टाकायचा.
अफताब हा बेपत्ता असल्याची तक्रार माणिकपूर पोलिसांना (Manikpur Police) 12 ऑक्टोबरला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. याप्रकरणी 7 नोव्हेंबरला गुन्हे प्रकटीकरण शाखेचे
सहायक पोलीस निरीक्षक सचिन सानप (Assistant Police Inspector Sachin Sanp)
यांनी टीमसह चौकशीला सुरुवात केली. यानंतर दिल्ली पोलिसांनी अफताबला ताब्यात घेतले.
तपासात त्याने खुनाची आणि इतर कृत्याची कबुली दिली. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे जंगलात पुरले असून,
दिल्ली पोलिस पुराव्यांचा शोध घेत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Delhi Crime | mumbai couple live in relationship marriage pressure girlfriend murder body parts accused arrested sensational revelation creepy inside story delhi police crime news
हे देखील वाचा :
Pune Crime | पाच वर्षीय शाळकरी मुलीवर बस चालकाचा लैंगिक अत्याचार
Pune Crime | खूनातील फरार आरोपीला 8 महिन्यांनी गुजरातमधून अटक, ग्रामीण पोलिसांची कारवाई