कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणूका काही दिवसावर येऊन ठेपल्या असताना वंचित बहुजन आघाडीने पहिल्यांदाच कोल्हापुरातून महिला उमेदवार डॉक्टर अरुणा मोहन माळी यांच्या नावाची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय प्रवक्ते लक्ष्मण माने यांनी केली.
वंचित बहुजन आघाडी राज्यातील सर्व जागा लढवणार असून कोल्हापुरातील उमेदवारीची घोषणा केली. तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार लवकरच घोषित करू अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय प्रवक्ते लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी लक्ष्मण माने म्हणाले कि प्रस्थापितांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीची स्थापन केली आहे. आघाडीत कुठलीच जात-धर्म न पाहता उमेदवारी दिली जाते.
वंचित बहुजन आघाडी हे महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा लढवणार असून काही महत्त्वच्या जागेवर लवकरचं उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचे माने म्हणले. या पत्रकार परिषदेला वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष आसलम मुल्ला, सांगली जिल्हा अध्यक्ष नामदेव करगणीत, प्रिया कांबळे, ॲड. इंग्रजीत कांबळे, सुशील कुमार कोल्हटकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.