Deepak Kesarkar | ‘ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांच्यासोबत राम राहू शकत नाही’, दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – ज्यांनी हिंदुत्व (Hindutva) सोडलं, त्यांच्यासोबत राम राहू शकत नाही. खरंतर हिंदुत्वाचे प्रतीक राम (Prabhu Shree Ram) आहे. आपण हिंदुत्वापासून लांब गेलो हे त्यांनी स्वत: पंतप्रधान यांच्यासमोर कबूल केलेलं आहे आणि महाराष्ट्रात पुन्हा युती करुन असं आश्वासन देऊन मुंबईत आल्यानंतर त्यांनी शब्द पाळला नाही, असा घणाघात दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता केला. रामनवमी (Ram Navami) निमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यावेळी सावरकर मुद्यावरुन दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. ते म्हणाले, बाळासाहेबांचे नाव आम्हाला दोष देण्यापुरता वापरत आहोत. पुन्हा जर सावरकरांचा (Veer Savarkar) अपमान केला तर आम्ही तुमच्या सोबत राहणार नाही असा इशारा दिला असता.
दीपक केसरकर पुढे म्हणाले, काही झालं की भाजपला (BJP) कठड्यात उभं करायचं. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना साधं नाव बदलण्याचा विषय काढला नाही. ज्या वेळेला सत्ता गेली त्यावेळेला कॅबिनेटची बैठक (Cabinet Meeting) घेऊन तुम्ही संभाजीनगर नामांतर करता. त्यातही दहा मंत्री बैठकीला गैरहजर होते. त्या बैठकीत काय घडलं हे मला माहिती नाही. हे तुमचे वरिष्ठ नेते महाविकास आघाडीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) बोलतात याचा अर्थ काय होतो, असा सवालही केसरकर यांनी केला.
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष (NCP) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्यात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते.
यावर बोलताना केसरकर म्हणाले, एक मला आजपर्यंत असं वाटत होतं,
काही नेते उशिरापर्यंत झोपतात आणि जे उशिरा झोपतात त्यांना स्वप्न दिसतात. मात्र,
अजितदादा (Ajit Pawar) आणि जयंत पाटील हे लवकर उठणारे नेते आहेत. त्यांना देखील असे स्वप्न पडायला लागले आहेत,
असा टोला त्यांनी लगावला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Deepak Kesarkar | uddhav thackeray met pm modi and changed the alliance decision say deepak kesarkar
हे देखील वाचा :
Pune Crime News | जुन्या कात्रज घाट रोडवरील हॉटेल तोरणाजवळ युवकाच्या खुनाचा प्रयत्न
Comments are closed.