Deepak Kesarkar | संजय राऊत यांच्या चौकशीच्या मागणीला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

Deepak Kesarkar | sanjay raut will have to go to jail says deepak kesarkar

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – Deepak Kesarkar | नागपूर न्यास भूखंड प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आम्ही दिल्लीला प्रमुख व्यक्तींकडे कागदपत्रे पाठवली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर एसआयटी स्थापन करून कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे हे प्रकरण तापले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोटाळ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारवासारव करत आहेत, असेही राऊत म्हणाले. त्यावर त्यांना आता शिंदे गटाचे आमदार आणि प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

आम्ही दिशा सालियन या मयत तरुणीला न्याय द्यायचा विचार करत आहोत. आम्ही तसे म्हटल्याने त्यांना इतके लागत का आहे? आम्ही कोणाचे नाव घेतले आहे का? विधानसभेत एसआयटी नेमण्याची मागणी करण्यात आली. चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. खोके घेतल्याबद्दल जे तुरुंगात गेले होते, त्यांनाच त्याचे महत्त्व जास्त कळते. खोके काढायचे असतील तर कोणाचे काढले जातील हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे विनाकारण लोक दुखावले जातील असे काही कोणी बोलू नये. तुम्हाला लोकांना प्रेम देता आले नाही, त्यांना भेटता आले नाही, त्यांच्या मतदासंघातील कामे करता आली नाहीत. फक्त पैसे घेऊन राजकारण करता आले असते, तर सगळे श्रीमंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाले असते. पंतप्रधानही बनू शकले असते, असे केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले.

 

केंद्र सरकारने रेशनची नवीन योजना जाहीर केली आहे. गरिबांना रेशन देण्यासंदर्भात त्यांनी योजना आणली आहे.
त्याचप्रमाणे राज्य सरकारने देखील एसआयटीचे रेशन सुरू केले आहे. मागेल त्याला एसआयटी दिली जात आहे.
महाराष्ट्रातून शिवसेनेचे 40 आमदार ज्या पद्धतीने 50 खोके देऊन फोडण्यात आले, तो काय व्यवहार होता,
त्यावर एक एसआयटी स्थापन व्हायला हवी. पण जे विषय पोलीस, सीबीआयने संपवले आहेत,
त्यावर एसआयटी स्थापन करून तुम्ही सत्तेचा गैरवापर करत आहात.
आम्ही सगळ्या तपासांना सामोरे जायला तयार आहोत आणि त्यात तुम्हीच तोंडावर पडाल, असे संजय राऊत म्हणाले होते.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Deepak Kesarkar | deepak kesarkar on shivsena sanjay raut demand over sit

 

हे देखील वाचा :

Honey Singh | आता गायक हनी सिंगने पठाण चित्रपटातील गाण्याबद्दल केले ‘हे’ मोठे वक्तव्य

IPL 2023 | CSK संघावर गंभीर आरोप करणारा ‘हा’ खेळाडू आता ‘या’ संघाकडून खेळणार

Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांच्या घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीसांकडून सारवासारव – संजय राऊत

Sanjay Raut | शिंदे सरकारला एसआयटी स्थापन करण्याची फार खाज, रेशन वाटावे तसे एसआयटी वाटत सुटलेत – संजय राऊत