गोंदिया : बहुजननामा ऑनलाईन – गोंदियामध्ये आमगाव पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीच्या मृत्यू Death प्रकरणात पोलीस निरीक्षकासह 3 पोलिसांना खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तर एक पोलीस उपनिरीक्षक अटकेच्या भीतीने फरार आहे. पोलिसांवर खूनाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कुंभारटोली येथील अनेक गुन्ह्यातील आरोपी राजकुमार अभयकुमार धोती याला अटक करण्यात आली होती. आमगाव कोठडीत पोलिसांनी राजकुमारला बेदम मारहाण केली होती. यामुळे त्याचा पोलीस कोठीत मृत्यू Death झाला होता. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू Death झाल्याचे सीआयडी तपासात निष्पन्न झाले होते.
या प्रकरणात आरोपी पोलीस निरीक्षक सुभाष चौहान, सहायक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे, अरुण उके, दत्तात्रय कांबळे यांच्या विरोधात भादवी कलम 302,330,34 अंतर्गत गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आहे. यात पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव पसार असून त्याला अटक करण्यात आलेली नाही. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.