Dagdusheth Ganpati Pune News | ‘परंपरा’ मधून पुणेकरांनी अनुभवला व्हायोलिनचा सुरेल अविष्कार ! व्हायोलिन वादक डॉ. संगीता शंकर, नंदिनी शंकर आणि रागिणी शंकर यांचे सादरीकरण

 Dagdusheth Ganpati Pune News | Pune residents experienced the melodious invention of violin from 'Parampara'! Violinist Dr. Performed by Sangeetha Shankar, Nandini Shankar and Ragini Shankar

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सव ; रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश

 

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Dagdusheth Ganpati Pune News | व्हायोलीन मधून निघणारे मधूर स्वर…जोडीला तबल्याची समर्पक साथ अशा सूरमयी वातावरणात व्हायोलिनच्या दमदार सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तीन पिढ्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या प्रख्यात व्हायोलिनवादक डॉ. संगीता शंकर (Dr Sangeeta Shankar), नंदिनी शंकर (Nandini Shankar) आणि रागिणी शंकर (Ragini Shankar) या ख्यातनाम कलाकारांनी आपल्या सुरेख सादरीकरणाने पुणेकरांची मने जिंकली. (Dagdusheth Ganpati Pune News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या सहाव्या दिवशी व्हायोलिनवादक डॉ. संगीता शंकर, नंदिनी शंकर आणि रागिणी शंकर यांनी ‘परंपरा’ हा कार्यक्रम सादर केला.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राग श्यामकल्याणमध्ये विलंबित एकतालात बंदिश सादर केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी झालेल्या सादरीकरणाला टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळाली.
त्यानंतर मध्यलय तीनताल त्यांनी सादर केला. मध्यलय दृत एकताल, आडा चारताल सादर करताना व्हायोलीनचे निघणारे सूर त्यांच्या ३ पिढ्यांच्या अद्भुत वादन परंपरेची साक्ष देत होते. कार्यक्रमाच्या समारोपाला बनारसची एक वेगळी रचना ‘होरी’ सादर करीत ‘सुखकर्ता दुखहर्ता’ आरती देखील व्हायोलिन वर सादर केली. (Dagdusheth Ganpati Pune News)

 

संगीत महोत्सव दि. ३० मार्च पर्यंत होणार असून यावर्षी पुण्यासह देशभरातील दिग्गज कलाकारांचे सादरीकरण हे महोत्सवाचे वैशिष्टय आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ७ ते १० यावेळेत हे दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

 

 

Web Title :-   Dagdusheth Ganpati Pune News | Pune residents experienced the melodious invention of violin from ‘Parampara’! Violinist Dr. Performed by Sangeetha Shankar, Nandini Shankar and Ragini Shankar

 

हे देखील वाचा :

Baramati News | आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करणारे बारामती येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्र

Prof Amita Bhide | शहरी दारिद्र्याचा बीमोड सामूहिक पातळीवरील प्रयत्नातून – प्रा.अमिता भिडे

Punyashloka Ahilya Devi Holkar Award | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण