बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आपण दररोज हॅकिंगच्या बातम्यांविषयी ऐकतो. आपला पर्सनल डेटा किंवा एखाद्या बड्या कंपनीचा डेटा चोरून हॅकर्स त्याचा गैरवापर करतात. आजकाल या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हॅकर्स वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून डेटाची चोरी करत आहेत. या दरम्यान अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ऑनलाइन हॅकिंग फोरमने दावा केला आहे की, त्याने 300 कोटीहून अधिक ईमेल आणि पासवर्ड लीक केले आहेत. तसेच या सर्व खात्यांचा डेटा एकाच ठिकाणी ठेवण्यात आल्याचा दावाही ऑनलाईन हॅकिंग फोरमने केला आहे. यामध्ये लिंक्डइन, मिनीक्राफ्ट, नेटफ्लिक्स, बडू, पेस्टीबिन आणि बिटकॉइनच्या वापरकर्त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हॅकिंगचा बळी पडलेले आणखी बरेच वापरकर्ते नेटफ्लिक्स आणि गूगलसाठी सामान पासवर्ड वापरत होते.
कसे जाणून घ्यायचे आपले खाते हॅक झाले कि नाही ?
सर्व प्रथम, आपण आपला पासवर्ड त्वरित बदलता. या व्यतिरिक्त, आपण hasibeenpwned.com आणि cyb