लखनौ :वृत्तसंस्था – Crime News | उपचाराच्या बहाण्याने नशेचे औषध देऊन सरकारी डॉक्टरने महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार केल्याची घटना लखनऊमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी २३ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल (Crime News) करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी डॉक्टर फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले. अखेर मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. आरोपी डॉक्टरची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यात (एमपी) एका महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्याप्रकरणी शनिवारी दोन जणांना अटक केली.
या प्रकरणाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
web title: Crime news doctor raped female constable giving her narcotic and then.