छत्तीसगड :वृत्तसंस्था – Crime News | छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील बलौदाबाजार (Baloudabazar) जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. भाजपच्या एका नगरसेवकाच्या (BJP corporator) मारहाणीचा व्हिडिओ (Video) समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे. एक संतापजनक बाब म्हणजे या भाजपच्या नगरसेवकाने मित्राच्या पत्नीला शारीरिक संबंधाची (Physical relationship) ऑफर दिली होती. यांनतर संतापलेल्या संबंधित महिलेनं नगरसेवकाला चपलेनं मारहाण केली. पण एवढ्यानंतर त्या नगरसेवकाने परत १५ दिवसानानंतर पुन्हा शरीर संबंधाची (Physical relationship) ऑफर दिली. या प्रकरणानंतर ती महिला थेट नगरसेवकाच्या कार्यालयात गेली. परंतु, तेथे नगरसेवकाने त्याच्या मित्रासह महिलेला मारहाण केलीय. यावरून पोलिसांनी एकाला (Crime News) अटक केलीय. मात्र नगरसेवक फरार झाला आहे.
https://twitter.com/
अधिक माहिती अशी की, सूर्यकांत ताम्रकर (Suryakant Tamrakar) असं भाजप नगरसेवकाचे नाव आहे. हा प्रकार सिमगा पोलीस ठाण्याच्या (Shimga Police Thane) हद्दीत घडला आहे.
नगरसेवक १५ दिवसांपूर्वी त्याच्या मित्राच्या घरी गेला होता.
त्यावेळी त्याने मित्राच्या पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्याची ऑफर दिली.
वहिनी आणि दिरामध्ये असे संबंध चालतात, असं नगरसेवकानं म्हटल्याचा आरोप संबंधित महिलेनं केला आहे. यामुळे महिला संतापली.
आणि महिलेनं नगरसेवकाला चपलेनं मारहाण केली.
दरम्यान, तिच्या पतीनं तिला रोखण्याचा प्रयत्न केला. पण महिलेनं नगरसेवकाला मारहाण केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, यांनतर भाजप नगरसेवक सूर्यकांत ताम्रकरने (BJP corporator Suryakant Tamrakar) १५ दिवसांनी पुन्हा महिलेला शारीरिक संबंध ठेवण्याची ऑफर दिली.
त्यानं महिलेला तसा मेसेज केला. यानंतर महिला एका तरुणीला सोबत घेऊन आरोपी नगरसेवकाच्या मित्राच्या दुकानात काठी घेऊन पोहोचली.
तिने आरोपीला काठीनं मारहाण केली.
त्यानंतर नगरसेवक आणि त्याच्या मित्रानं महिला आणि तरुणीला जमिनीवर आपटलं.
दोघांचे केस ओढून त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी दुकानाजवळ मोठा जमाव झाला होता.
Web Title : crime news | chhattisgarh bjp councilor beats friends wife denying sexual favour.
Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाल्या…
Pune Crime | पुण्यातील पोलीस ठाण्यात फिनाईल पिऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रचंड खळबळ
Mumbai Crime | अल्पवयीन विद्यार्थिनीला पॉर्न दाखवून केलं मास्टरबेट, शिक्षक ‘गोत्यात’