बहुजननामा ऑनलाईन टीम
पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच मंचरमध्ये 24 तासांमध्ये एकाच गावात तब्बल 176 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांची ही माहिती दिली.
जिल्ह्यातील मंचर गाव कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट बनला आहे. झेडपी आरोग्य विभागाकडून मंचर गावात 1001 रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 176 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर उर्वरित तालुक्यातही 33 रूग्ण आढळून आले आहेत. मंचर तालुक्यात एकूण 209 कोरोना रूग्ण झाले आहेत. 20 हजार लोकसंख्येच्या असलेल्या गावात अनेक गावातल्या लोकांची वर्दळ असते. सुरक्षा नियमांचे पालन केले नसल्याने कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक अंतर राखण्यास पसंती देणे आवश्यत आहे. अन्यथा कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.