पुणे : Rohit Pawar-Baramati Lok Sabha | बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पैसे वाटप (Distribution of Money In Baramati) करण्यात आलाचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला होता. आमदार रोहित पवार यांनी पैसे वाटपाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यासंबंधी तक्रार केल्यानंतर आता बारामती पोलिसांनी (Baramati Police) निवडणुकीत पैसे वाटल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी बारामती पंचायत समितीत शाखा अभियंता असलेले केशव तुकाराम जोरी (वय ३९) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व कलम १२३ (१), तसेच भादंवि १७१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
७ मे रोजी बारामतीतील साठेनगर परिसरात असलेल्या मतदान केंद्र क्रमांक १६७ परिसरात पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंबंधिचे व्हिडिओ रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या चित्रफितीची पडताळणी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचे व्हिडिओत आढळल्यानंतर जोरी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Wanwadi Pune Crime News | वानवडी परिसरातील वारकर मळा येथील BGS ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा (Videos)