बहुजननामा ऑनलाईन – कोरोना विषाणूचा रूग्णांच्या हृदय आणि फुफ्फुसांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आणि त्याचा प्रभाव बराच काळ राहतो. अलीकडेच कोरोना विषाणूमधून बरे झालेल्या लोकांमध्ये आतड्यांसंबंधी संसर्ग देखील पाहायला मिळत आहे, ज्यामुळे डॉक्टरांची चिंता वाढली आहे.
कोविड-१९ पाचन तंत्र आणि आतड्यांसह शरीराच्या सर्व महत्वाच्या अवयवांना प्रभावित करते. आता असे समोर आले आहे की, आतड्यांसंबंधी कार्यात असंतुलन यासारखी लक्षणे दीर्घकाळ असू शकतात. नवीन संशोधनानुसार, कोविड-१९ पॉझिटिव्ह रूग्णांना विषाणू आतड्यांसंबंधी संसर्ग होऊ शकतो, गॅस्ट्रोइन्टेस्टाईनल संसर्गाशी संबंधित प्रारंभिक लक्षणे दिसणे आवश्यक नसते.
कोविड-१९ बराच काळ शरीराला नुकसान पोचवते
संशोधनाच्या निष्कर्षात असेही म्हटले आहे की, वायुमार्गातून विषाणूचा नाश झाल्यानंतरही पाचन तंत्रामध्ये व्हायरस सक्रिय राहण्याची शक्यता अधिक असते. जीयूटी या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित हे संशोधन चीनच्या हाँगकाँग विद्यापीठाच्या तज्ञांनी केले होते. संशोधकांचे म्हणणे आहे की, हे निष्कर्ष उपचार आणि लक्षणे ओळखण्यासाठी अंदाज वर्तवू शकतात, ज्यामुळे रुग्णांना बरे होण्यास मदत होते.
नवीन संशोधन
हाँगकाँगच्या वैज्ञानिकांनी त्यांच्या अभ्यासाच्या आधारावर म्हटले की, कोविड-१९ चे विष्ठाद्वारेही प्रसार होऊ शकतो. अभ्यासासाठी चीनच्या गुआंगडोंग प्रांतात ७३ रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांच्या विष्ठेच्या नमुन्यांचे विश्लेषण केले गेले. विश्लेषण केल्यावर असे आढळले की, विषाणूचे नमुने ४० पेक्षा जास्त रुग्णांच्या विष्ठेमध्ये आढळले आहेत.
कोरोनामुळे होऊ शकते गॅस्ट्रोइन्टेस्टाईनल संक्रमण
या कोरोना पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये १५ रुग्णांचे विश्लेषण केले गेले आणि त्यांच्या लक्षणांचा तपशीलवार अभ्यास केला गेला. ज्यामध्ये असे आढळले की मळमळ, अतिसार किंवा गॅस्ट्रोइन्टेस्टाईनल आजाराशी संबंधित लक्षणे नसलेल्याही सर्व १५ रुग्णांमध्ये सक्रिय आतड्यांमधील संसर्ग आढळला. आश्चर्याची बाब ही होती की, यापैकी ३ रुग्ण कोरोना टेस्टमध्ये नकारात्मक आढळले होते.
संशोधनातून काय सिद्ध झाले?
हे बर्याच काळापासून स्पष्ट आहे की, कोविड-१९ दीर्घकाळ आरोग्यावर परिणाम करू शकतो. पण नवीन संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की, श्वसनाच्या नमुन्यांची चाचणी हे नाकारू शकत नाही कि व्यक्तीला कोरोना आहे कि नाही. कारण मानवी विष्ठेपासूनही संक्रमणाचा प्रसार शक्य आहे.
नुकत्याच केलेल्या संशोधनात असेही आढळले आहे की, लहान मुलांमध्ये आतड्यांसंबंधी संसर्गाची चिन्हेदेखील स्पष्ट होती, ज्यांना विषाणूची लागण होऊन ३ आठवड्यांपर्यंतचा काळ झाला होता.