पिंपरी न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Chinchwad Coronavirus) दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 187 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद (Coronavirus in Pimpri) झालेली नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 187 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 67 हजार 763 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 208 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 62 हजार 446 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरामध्ये सध्या 1 हजार 159 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 02 रुग्ण शहरातील आहेत. तर 01 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4384 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी (दि.19) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 14 हजार 723 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 12 लाख 94 हजार 970 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title : Coronavirus in Pimpri | 208 corona patients discharged in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 254 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
PM Modi | पीएम मोदी सध्या एकवेळ भोजन करत आहेत, स्वत:च सांगितले कारण; पहा व्हिडिओ