मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Coronavirus in Maharashtra | राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत आज (बुधवार) घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्याला दिलासा मिळाला आहे. राज्यात आज 3,783 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 4,364 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
https://twitter.com/PIBMumbai/
राज्यात आतापर्यंत 63 लाख 17 हजार 070 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.07 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 56 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 38 हजार 277 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील मृत्यूदर स्थिरावला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सध्या राज्यात 49 हजार 034 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 63 लाख 61 हजार 089 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 07 हजार 930 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 2 लाख 87 हजार 356 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,926 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Web Titel :- Coronavirus in Maharashtra | In the last 24 hours, 4,364 people have been released from Corona in the state.
OBC Reservation | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार