Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा! राज्यात ‘कोरोना’ची दैनंदिन रुग्णसंख्या हजाराच्या आत, मृत्यूच्या संख्येत मोठी घट, जाणून घ्या इतर आकडेवारी
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येत (Coronavirus in Maharashtra) मोठी घट पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. रुग्ण संख्या कमी झाल्याने राज्यातील सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. राज्याच्या आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत राज्यात 806 नव्या रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) नोंद झाली आहे. तर 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
https://twitter.com/PIBMumbai/status/1495777053404467202?s=20&t=5xG_sKeH5lMEZ7gmj_7AXw
राज्यात आज 2 हजार 696 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत 76 लाख 97 हजार 135 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.94 टक्के झाले आहे. राज्यात आज 4 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 43 हजार 586 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.
राज्यात आजपर्यंत 7 कोटी 72 लाख 89 हजार 104 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 78 लाख 59 हजार 237 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 14 हजार 525 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 1 लाख 76 हजार 378 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 1036 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.
Web Title :- Coronavirus in Maharashtra | Great relief! Corona’s daily patient count in the state is less than a thousand, the number of deaths has dropped dramatically, find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Municipal Corporation (PMC) | स्थायी समितीच्या मुदत संपलेल्या 8 जागांवर नवीन नियुक्त्या
PM Kisan Samman Yojana | PM किसान योजनेत महत्त्वाचे 2 बदल, जाणून घ्या
Comments are closed.