मुंबई न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात एकूण 6 हजार 686 नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान (Coronavirus in Maharashtra) झाले आहे. तसेच आज नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. आज एकूण 5 हजार 861 इतके रुग्ण बरे (patients recover) झाले आहेत. तसेच आज एकूण 158 रुग्णांचा मृत्यू (Death) झाला आहे, राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आजच्या 158 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. याशिवाय राज्यात आतापर्यंत एकूण 61 लाख 80 हजार 871 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.85 टक्के एवढे झाले आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची (Active patient) संख्या 63 हजार 004 इतकी झाली आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 05 लाख 45 हजार 552 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63 लाख 82 हजार 076 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 238 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 237 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 08 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 03.
– 198 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 489970.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2125.
– एकूण मृत्यू – 8837.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 479008.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 9211.
पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 207 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 152 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात 01 जणाचा मृत्यू
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 266874.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 879.
– एकूण मृत्यू – 4371.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 261624.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 5051.
Web Title : Coronavirus in Maharashtra | 6,686 new patients of Corona in the last 24 hours in the state know other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Rain in Maharashtra | विकेंडनंतर राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान खात्याकडून अलर्ट जारी