बहुजननामा ऑनलाइन – राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कर्मचारी निवड परीक्षा घेण्यात येणार आहेत. (guidelines)कर्मचारी निवड समितीने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन परिक्षार्थींसाठी मार्गदर्शक तत्वे(guidelines) जारी केली आहेत. परीक्षेचे स्वरूप ऑनलाइन पद्धतीचे असणार आहे. जे कोणी ही परीक्षा देणार आहेत, त्यांनी कोविड-19 चा सेल्फ डिक्लरेशन फॉर्म त्यांच्यासोबत ठेवावा. कोरोना पॉझिटीव्ह व्यक्ती ही परीक्षा देत नाही ना, याची खात्री करण्यासाठी हा फॉर्म भरणे आवश्यक आहे.
परिक्षार्थींनी संपूर्ण वेळ मास्क घालावा लागणार आहे. त्याशिवाय सॅनिटायझर सोबत ठेवावा लागणार आहे. परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ रोल नंबर आणि लॅब नंबर याची मार्गदर्शक पाटी दिसणार नाही. ही सर्व माहिती वैयक्तिकरित्या त्यांना परीक्षेला बसताना दिली जाईल. परीक्षेला बसताना सोशल डिस्टन्स ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थी प्रवेश करताना थर्मो गनने तपमान मोजले जाणार आहे.
त्यानंतर नोंदणीच्या डेस्कवर केवळ उमेदवाराचा फोटो घेतला जाईल. खबरदारीचा उपाय म्हणून अंगठ्याचा ठसा घेतला जाणार नाही. त्यांना उपस्थिती पत्रक भरण्यापूर्वी आणि नंतर हात सॅनिटाईज करण्याचा सल्ला देण्यात येईल. केंद्रांवर पोहोचल्यानंतर त्यांनी इतरांपासून सहा फूट अंतर राखले पाहिजे. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होताना हॉल तिकीट आणि फोटो आयडी सोबत असणे महत्वाचे आहे. परीक्षा देणार्यांनी परीक्षेचा कालावधी संपल्यानंतरच परीक्षा हॉलमधून बाहेर जावे लागणार आहे.