नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरस संकट पुन्हा गडद होत चालले आहे. कोरोनाचे डबल म्यूटंट व्हेरियंट (Double mutant variant) देशाच्या 18 राज्यांमध्ये सापडले आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी यासंदर्भात माहिती दिली. मंत्रालयानुसार, कोरोनाचा नवा व्हेरियंट जुन्याच्या तुलनेत जास्त जीवघेणा आहे.
एका प्रेस नोटमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे शेयर करण्यात आलेल्या एकुण 10,787 पॉझिटिव्ह सॅम्पलमध्ये आतापर्यंत एकुण 771 कोविड-19 व्हेरियंट्स सापडले आहेत.
मंत्रालयानुसार, यामध्ये युके (बी .1.1.7) व्हायरसच्या 736 सॅम्पलचा समावेश आहे. दक्षिण अफ्रीकेच्या (बी.1.351) व्हायरसचे 34 सॅम्पल सुद्धा पॉझिटिव्ह आढळले आहेत. एक सॅम्पल ब्राझील (बी.1) व्हेरियंटचे आहे, जे पॉझिटिव्ह आढळले आहे. देशातील 18 राज्यांत या व्हेरियंटचे नमून्यांची ओळख पटवण्यात आली आहे.
डबल म्यूटंट व्हेरियंट म्हणजे काय?
डबल म्यूटंट व्हेरियंटचा अर्थ, एका व्यक्ती कोरोना व्हायरसच्या दोन वेगवेगळ्या व्हेरियंट (टाईप) ने संक्रमित होणे आहे. यास सोप्या शब्दांत कोरोनाचे डबल इन्फेक्शन म्हणू शकता. जगात असे पहिले प्रकरण ब्राझीलमध्ये आढळले होते. ब्राझीलमध्ये दोन रूग्ण एकाचवेळी कोरोना व्हायरसच्या दोन वेगवेगळ्या व्हेरियंटने संक्रमित आढळले होते.
पंजाबमध्ये 401 नवीन सॅम्पलपैकी 81 टक्के डबल व्हेरियंटची
पंजाबमध्ये कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरियंटने लोकांच्या मनात भिती निर्माण केली आहे. हा व्हेरियंट युकेतून आला आहे. नुकत्याच घेण्यात आलेल्या 401 नव्या सॅम्पलपैकी 81 टक्के सॅम्पलमध्ये हे व्हेरियंट आढळले. दिल्लीच्या नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलला आढळले की, 81 टक्के सॅम्पलमध्ये नव्या व्हेरियंटची ओळख बी 1.1.7 म्हणून करण्यात आली आहे. पंजाबमध्ये नवीन व्हेरियंट आल्याने लोक त्रस्त आहेत.