मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात कोरोनाने कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीत अचानक चौपट पटीने वाढ झालेली दिसत आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्याची अवस्था अधिक कठीण झाली आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली तर ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडेल. अशी भीती मंत्रालयातील अधिकाऱ्याकडून व्यक्त होत आहे.
या दरम्यान, रुग्णांना ऑक्सिजन प्राधान्याने द्या, असे राज्य शासनाने आदेश काढला गेला. तर या आदेशाचा परिणाम उद्योगावर होताना दिसतो. तसेच राज्यात रोज १२०० मेट्रीक टन ऑक्सिजन तयार होतोय. त्यापैकी सामान्य परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रासाठी १५० ते २०० मेट्रीक टन ऑक्सिजन लागतो परंतू, कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे हीच मागणी दररोज ७०० मेट्रीक टनांपर्यंत वाढली आहे. तसेच मागच्या वर्षी कोरोनाने उद्रेक केला होता, तेव्हा ही मागणी ६०० मेट्रीक टनांपर्यंत पोहचली होती. तर सध्या ती आणखी वाढलेली दिसते. जर रुग्णसंख्या वाढली आणि रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडू लागली तर परिस्थिती कठीण होऊ शकते. असे जनआरोग्य योजनेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात ऑक्सिजन तयार करणारे ४ ते ५ प्रमुख उत्पादक आहेत, यामध्ये पन्नासच्या जवळपास बॉटलिंग प्लँट आहेत. तर ते सर्व पूर्ण क्षमतेने चालू आहेत. आपल्याकडे स्टील प्लँट, केमिकल कंपन्या, फोर्जिंग प्लँट अशा अनेक विविध जागी ऑक्सिजनची आवश्यकता असते. मात्र, त्या जागी प्राधान्य न देता रुग्णालयासाठी ऑक्सिजन देणे प्रारंभ झाले. याकारणाने या कंपन्या संकटात येण्याची दाट शक्यता आहे. परिणामी या ठिकाणी काम करणारे कर्मचारीदेखील अडचणीत सापडतील, तसेच, जर नागरिक लोक असेच बेशिस्तपणे विनामास्क फिरत राहिले आणि रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर सरकारला ऑक्सिजन मिळविणेदेखील अडचण येऊ शकते. महाराष्ट्रात अनेक शेकडो रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. अनेक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाशिवायचे रुग्णही आहेतच. अशा परिस्थितीत लोंकानी शिस्त पाळावी आंही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही, असे मंत्रालयातील अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.
तसेच , नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील १ प्लँट तांत्रिक कारणासाठी बंद ठेवावा लागला तेथे औरंगाबाद जिल्हा किंवा अन्य कोठूनही ऑक्सिजन पाठवायचा असेल तर त्यात वेळ अधिक जाणार होता. अखेर शासनाने धडपड करून मध्यप्रदेश राज्यातील भिलाई येथून ४०० मेट्रीक टन ऑक्सिजन मागविला आहे.