नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणू संसर्गाची गती वेगाने वाढत आहे. देशातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 32 लाखांच्या आसपास आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची प्रकरणे ज्या प्रकारे समोर येत आहेत, त्यानुसार एक लाख नवीन प्रकरणे येण्यास अवघ्या दोन दिवसांचा कालावधी लागतो. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत कोरोनाचे 60 हजार 975 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 848 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर आता संक्रमित रूग्णांची संख्या 31 लाख 67 हजार 323 झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात सध्या कोरोनाचे 7 लाख 4 हजार 348 सक्रिय रुग्ण आहेत, तर कोरोनाच्या संसर्गामुळे 58 हजार 390 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 24 लाख 4 हजार 585 लोक बरे झाले आहेत ही दिलासा देणारी बाब आहे. देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाखांवर पोहचणार आहे.
India's #COVID19 case tally crosses 31 lakh mark with 60,975 fresh cases and 848 deaths in the last 24 hours.
The #COVID19 case tally in the country rises to 31,67,324 including 7,04,348 active cases, 24,04,585 cured/discharged/migrated & 58,390 deaths: Ministry of Health pic.twitter.com/X0tb6dYInC
— ANI (@ANI) August 25, 2020
महाराष्ट्रात सोमवारी कोविड-19 चे 11,015 नवीन रुग्ण समोर आले आहेत. यासह, राज्यात कोरोना विषाणू संक्रमित एकूण रुग्णांची संख्या सुमारे 7 लाखांपर्यंत म्हणजेच 6,93,398 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात 17 ऑगस्ट रोजी कोविड -19 रुग्णांची संख्या सहा लाखांच्या पुढे गेली आणि मंगळवारी ही संख्या सात लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार कोविड -19 मुळे आणखी 212 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत महाराष्ट्रात 22,465 लोकांचा बळी गेला आहे.
गुजरातमध्ये कोविड-19 चे 1,067 नवीन रुग्ण समोर आले
सोमवारी गुजरातमध्ये कोविड-19 चे 1,067 नवीन रुग्ण समोर आल्यानंतर राज्यात संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 87,846 झाली आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, या काळात आणखी 13 रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या 2,910 वर पोहोचली आहे. सोमवारी राज्यातील विविध रुग्णालयातून 1,021 रूग्णांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले होते. यासह राज्यात आतापर्यंत 70,250 लोकांनी या साथीचा पराभव केला आहे.
कर्नाटकात कोविड-19 चे 5,851 नवीन रुग्ण आले समोर
सोमवारी कर्नाटकात कोविड-19 चे 5,851 नवीन रुग्ण समोर आल्यानंतर राज्यात संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 2,83,665 पर्यंत वाढली आहे. आरोग्य विभागाने म्हटले आहे की सोमवारी कोरोना विषाणूमुळे आणखी 130 लोकांच्या मृत्यूची नोंद झाली असून, राज्यात 4,810 लोकांनी आपला जीव गमावला आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत 1,97,625 लोक बरे झाले आहेत तर 81,211 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी 768 रुग्णांना गंभीर प्रकृतीमुळे आयसीयूमध्ये दाखल केले आहे.
सिक्किममध्ये आणखी 43 लोकांना कोरोनाची लागण झाली
सोमवारी सिक्कीममध्ये आणखी 43 लोकांना कोरोना विषाणूची लागण होण्याची पुष्टी झाली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, यासह राज्यात कोविड -19 रुग्णांची संख्या वाढून 1,446 झाली आहे. एकट्या पूर्व सिक्कीम जिल्ह्यात 43 नवीन प्रकरणांपैकी 42 रुग्ण आढळले आहेत तर पश्चिम जिल्ह्यात एका व्यक्तीस संसर्ग झाल्याची खात्री आहे.